Latest

Pune Ganeshotsav 2023 : पुण्यात गणपतीची वर्गणी न दिल्याने दुकानदाराला बेदम मारहाण; कार्यकर्त्यांवर गुन्हा

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वर्गणी न दिल्याने किराणा माल दुकानदाराला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शिवम जयपाल सिंग (वय 27), तुषार संजय थोरात (वय 19), निखिल दिलीप कांबळे यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किराण माल विक्रेता दिनेश भिकाराम गोरा (वय 20, रा. लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी स्टेशन परिसरात न्यू बालाजी ट्रेडर्स किराणा माल विक्रीचे दुकान आहे. श्रीमंत काळभैरवनाथ प्रतिष्ठान, अष्टविनायक मंडळाचे कार्यकर्ते शिवम सिंग, तुषार थोरात, निखिल कांबळे आणि एक कार्यकर्ता वर्गणीसाठी दुकानात गेले. त्यांनी गोरा यांच्याकडे तीन हजार रुपयांची वर्गणी मागितली. गोरा यांनी 101 रुपये देतो, असे सांगितले. या कारणावरून सिंग, थोरात, कांबळे यांनी त्यांच्याशी वाद घातला. गोरा यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. गोरा यांचा मोबाइल संच फोडला. पोलिस उपनिरीक्षक धायगुडे तपास करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT