नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने कच्चे सोयाबीन तसेच सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील शुल्क कमी केले आहे. यामुळे आगामी काळात खाद्यतेलाच्या दरात कपात होणार आहे. आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय येत्या 30 जूनपर्यंत अंमलात असेल.
टॅरिफ रेट कोटा (TRQ) अंतर्गत कच्चे सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील शूल्क कमी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कृषी आयातीवर लावला जाणारा ऍग्री इन्फ्रा सेसदेखील वरील उत्पादनांना लावला जाणार नाही. टॅरिफ रेट कोटा हा असा असा कोटा असतो की ज्यात शून्य अथवा नाममात्र आयात शूल्क असते. याआधी क्रमशः जानेवारी आणि मार्च महिन्यात वरील दोन उत्पादनांवरील टीआरक्यू श्रेणी हटविण्यात आली होती.
हेही वाचा :