Latest

गोमातेला राष्ट्रीय दर्जा मिळावा म्हणून गोसेवकाची भारतभ्रमंती, आतापर्यंत 13 हजार किलोमीटरचा पायी प्रवास…

गणेश सोनवणे

लासलगाव (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ; गोमातेला राष्ट्रीय दर्जा मिळो, गोहत्या बंद व्हावी, गोमातेचे महत्त्व सर्वांना समजो या उद्देशाने जनजागृतीसाठी गोसेवक शिवराज शेखावत महाराज देशभर भ्रमण करत असून ते लासलगावी आल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले. ११ डिसेंबर २०२१ रोजी त्यांनी तामिळनाडूच्या रामेश्वरम येथून भारतभ्रमंतीला सुरूवात केली. या ३४ महिन्यांत त्यांनी आतापर्यंत आंध्रप्रदेश, तेलंगाना, छत्तीसगड, उडीसा, प. बंगाल, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश, हिमाचल, जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र अशी १८ राज्ये पादाक्रांत केली आहेत. ते आतापर्यंत १३००० किलोमीटर पायी चालले आहेत.

संबधित बातम्या :

 ते आता महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात भ्रमंती करत असून लासलगावातून पुढे विंचूर, येवला, छत्रपती संभाजीनगर मार्गे पुढे उज्जैन येथे जाणार आहेत.

महालक्ष्मी नगर, कोटमगाव रोड येथे थांबून सकाळी पुढच्या प्रवासासाठी निघताना त्यांच्या प्रस्थानाची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यांच्या दर्शनासाठी, त्यांच्या महान उद्देशाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच भारतभ्रमंतीत त्यांच्यासोबत पाच पाऊल चालण्यासाठी लासलगाव परिसरातील गोसेवक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. त्यात संतोष केंदळे, राजेंद्र जाधव, राजेंद्र कराड, सुरज पवार, शुभम बकरे, चिराग जोशी, शिवाजी विसपुते, ऋषीकेश जोशी, प्रदिप पवार, गणेश कुलकर्णी, चेतन विसपुते, ऋषीकेश कुमावत आणि परिसरातील गोसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT