Latest

धनगर शक्तीप्रदत्त समितीत उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांचा समावेश करावा : गोपीचंद पडळकर

अनुराधा कोरवी

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : राज्यभरात झालेल्या उपोषणानंतर आपल्या महायुती सरकारने धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 'धनगर शक्तिप्रदत्त समिती' बनते आहे. या समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान द्यावे अशी मागणी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

संबंधित बातम्या 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, धनगर शक्तीप्रदत समिती प्रभावीपणे काम करेल अशी आशा आहे. परंतु, ज्यांनी धनगर आरक्षणासाठी प्रामाणिक काम केले. त्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या समितीत स्थान दिलेले नाही. या समितीत देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात यावे अशी समस्त धनगर समाजाची भावना आहे. 'आदिवासींना ते धनगरांना' ही संकल्पनाच मुळी देवेंद्र फडणवीस यांची आहे. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्यात 'धनगड' नसून ते 'धनगर' असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले.

तसेच धनगर समाज योजनांपासून ते आरक्षण अंमलबजावणीपर्यंत सर्व प्रक्रियेत फडणवीस यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे धनगर शक्तीप्रदत समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करावा अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

SCROLL FOR NEXT