Latest

Google Mistake : गुगलने चुकून एका हॅकरला पाठवले 2 कोटी रुपये, ट्विट व्हायरल…वाचा काय म्हणाले गुगल

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Google Mistake  गुगलने चुकून एका हॅकरला 2 कोटी रुपये हस्तांतरित केले आणि ते परत घेण्यास विसरले. सॅम करी नावाच्या हॅकरने गुगलला त्यांच्या या चुकीची माहिती देण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला. त्याने ट्विट करून गुगलला टॅग केले आणि म्हटले, 'गुगलला ते परत नको असेल तर ठीक आहे,' अशी त्याने खिल्ली उडवली.

सॅमने ट्विटमध्ये म्हटले आहे, "Google ने मला चुकून $249,999 पाठवून 3 आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे आणि मी अद्याप समर्थन तिकिटावर काहीही पाहिले नाही. यासाठी @Google ला संपर्क साधण्याचा कोणता मार्ग आहे का? (तुम्हाला ते परत नको असेल तर ठीक आहे…)", असे त्याने ट्विटर हँडलवर लिहिले आहे.

Google Mistake सॅमची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. त्याच्या ट्विटर हँडलवर शेकडो लोकांनी रिप्लाय करून वेगवेगळे सल्ले दिले. कोणी म्हटले हॅव फन, तर कोणी याला स्कॅम म्हटले असून जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच काहींनी ही गुगलची चूक असून कदाचित गुगल अॅड सेन्सचे पैसे चुकून पाठवले असण्याची शक्यता आहे, त्यांनी तुम्हाला पैसे रिटर्न मागितले तर तुम्ही त्यांच्या इनकॉर्पोरेशन डॉक्यूमेंटची कॉपी तुम्ही त्यांच्याकडून निश्चितच घ्यायला हवी, असे वेगवेगळे सल्ले सॅमला देण्यात आले आहे. तर कोणी म्हटले आहे ते नक्की गुगलच आहे का याची खात्री करून घेणे गरजेचे आहे, किंवा कोणीतरी गुगलच्या नावाचा वापर करत आहे असेही असू शकत, असे एका ट्विटर युजरने म्हटले आहे.

सॅमचे या ट्विटला 4171 लाइक्स मिळाले आहेत तर 263 जणांनी रिट्विट केले आहे आणि 110 जणांनी यावर कोट ट्विट केले आहे.
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अखेरीस, गुगलने चुकून त्यांच्याकडे 2 कोटी रुपये हस्तांतरित केल्याचा त्यांचा संशय खरा ठरला.
गुगल प्रवक्त्याने याबाबत सांगितले, "आमच्या टीमने अलीकडेच मानवी चुकांचा परिणाम म्हणून चुकीच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले," " खातेधारकाने आम्हाला ते त्वरीत कळवले याचे आम्ही कौतुक करतो आणि आम्ही ते दुरुस्त करण्याचे काम करत आहोत." Google Mistake

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT