Latest

Sound Sleep : जेवणातील ‘हे’ बदल देतील तुम्हाला शांत झोप

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात चांगली झोप न लागणे ही मोठी समस्या बनली आहे. सतत मोबाईलला खिळून असणे, व्यायामाचा अभाव, जंकफूड अशामुळे या समस्येत भरच पडत आहे. आरोग्यदायी जीवनासाठी चांगली झोप (Sound Sleep ) अत्यंत आवश्यक मानली गेली आहे. झोप न लागणे हे काही मानसिक व्याधींचे मूळ कारण आहे. चांगला व्यायाम आणि जोडीने योग्य आहार असेल तर झोप न लागण्याची समस्या दूर होऊ शकते. रोजच्या जेवणात काही बदल केले तर ही झोप न लागण्याची तक्रार कमी होण्यात मदत होते. (Sound Sleep)

१. कोमट दूध – कोमट दुधाचा चांगली झोप येण्यात फार चांगला उपयोग होतो. दुधात ट्रिप्टोफान नावाचे एक अॅमिनो अॅसिड असते, त्याचे रुपांतर सिरोटोनिन या हार्मोनमध्ये होते. सेरोटोनिनमुळे मेंदू शांत राहातो आणि चांगली झोप येते. कोमट दुधात एक चिमूट जायफळ पावडर, एक चिमूट वेलदोडे पावडर आणि थोडी बदाम पावडर टाकली तर याचा फार चांगला फायदा झोपेसाठी होतो.

२. चेरी – झोपेचे चक्र नियंत्रित करण्यात मेलॅटोनिन या हार्मोनचे कार्य नीट राहणे फार महत्त्वाचे असते. चेरीमध्ये मेलॅटोनिन चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे दिवसभरात १० – १२ चेरी खाल्या तर त्याचा झोप येण्यासाठी चांगला उपयोग होतो.

Almonds nuts in wooden bowl and almond milk in glass on wood table background.

३. बदाम – मेंदूच्या आरोग्यासाठी बदामाचे फायदे सर्वश्रूत आहेत. बदाम खाण्याचा चांगला फायदा झोप येण्यासाठी होतो. दुधाप्रमाणेच बदामातही ट्रिफ्टोफान असते. याशिवाय बदामात मॅग्नेशिअमही असते, त्यामुळे हृदयाचे कार्य चांगले राहते. रोज थोडे बदाम खालेल तर त्याचा चांगली झोप येण्यासाठी फायदा होतो.

४. केळी – स्नायूंना आराम मिळावा यासाठी मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमचा फार चांगला लाभ होतो. या दोन्हींचे प्रमाण केळ्यात भरपूर आहे. शिवाय केळ्यात कर्बोदकेही असतात, त्यामुळे त्याचा चांगला उपयोग झोप नीट येण्यासाठी होतो.

५. ओट्स – ओट्स खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते. आणि ओट्सचा फायदा वजन कमी करण्यासाठीही होतो. ओट्स खाताना त्यात थोडे मध आवश्य घालावे.

६. कॅमोमाईल चहा – हा चहा एक प्रकारच्या फुलांपासून बनवतात. मज्जासंस्थेला आराम देण्याचे काम या चहामुळे होतो. या चहातील फल्वोनाईड आणि एपेजेनिन हे घटक असतात, त्यामुळे चांगली झोप येण्यासाठी फायदा होतो.

७. रताळी – रताळ्यांमध्ये कर्बोदके आणि पोटॅशिअम हे महत्त्वाचे घटक असतात. या दोन्ही घटकांचा फार चांगला फायदा झोप चांगली येण्यासाठी होतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT