पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही दिवस सोने-चांदीच्या दराला झळाळी मिळाली होती, सातत्याने दोन्ही धातुंनी विक्रमी दर गाठले होते. मात्र, आज सोने चांदी दराला अल्प घट नोंदवली गेली आहे. आजचा सोन्याच्या भावात ५५० रुपयांनी घट होऊन ५७,१६० इतका दर झाला आहे. तर चांदीचा भाव ७०,८०० रुपयांपर्यंत घटला आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमची किंमत ५२,४०० रुपये आहे. गुडरिटर्न्स वेबसाइटनुसार, शुक्रवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याच्या किमती ५५० रुपयांनी कमी झाल्या आणि २४ कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमचा व्यवहार ५७,१६० रुपयांवर झाला. चांदीच्या भावातही ५५० रुपयांनी घट झाली आहे.
डॉलरच्या वाढीमुळे सोन्याचे दर कमी झाले आहे. आज (१० फेब्रुवारी) भारतातील सोन्याचा भाव पाहता अल्प मुदतीच्या उत्पन्नाच्या वाढत्या दबावामुळे एका महिन्याच्या निचांकी पातळीवर गेले आहेत.
२२ कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा भावही ५०० रुपयांनी कमी होऊन ५२,४०० रुपयांवर विकला गेला आहे. दिल्ली, बेंगळुरू आणि चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याच्या दहा गॅमची किंमत अनुक्रमे ५२,४५० रुपये, ५२,४५० रुपये आणि ५३,२०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमची किंमत कोलकाता आणि हैदराबादमधील सोन्याच्या किंमती ५७,१६० रुपये आहे. दिल्ली, बेंगळुरू आणि चेन्नईमध्ये १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे ५७,३१० रुपये, ५७,२१० रुपये आणि ५८,०४० रुपये आहे. दिल्ली, मुंबई आणि कोलकात्याच्या १ किलो चांदीची किंमत ७०,८०० रुपये आहे. तर बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमध्ये १ किलो चांदीची किंमत ७२,५०० रुपये आहे.
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र, दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते. (Gold prices today)
हेही वाचा