Latest

Gold Prices Today : सोन्याची उच्चाकांवरुन घसरण, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय बाजाराचा कल आणि अमेरिकेतील जीडीपीच्या आकडेवारीचा सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला आहे. सोन्याचा दर उच्चांकावर पोहोचल्यावर आता त्यात घसरण होऊ लागली आहे. सोन्याच्या दरात शनिवारी (Gold Prices Today) सुरुवातीच्या व्यवहारात ६०० रुपयांची घट झाली. यामुळे २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम (प्रति तोळा) दर ५४,२२० रुपयांवर आला. तर चांदीच्या दरात बदल झालेला नाही. चांदीचा प्रति किलो दर ७०,१०० रुपयांवर आहे. गुडरिटर्न्स वेबसाइटनुसार, २२ कॅरेट सोन्याचा दर शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी ५५० रुपयांनी कमी झाला. यामुळे २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४९,७०० रुपयांवर आला.

मुंबई, कोलकाता आणि हैदराबादमध्ये १० ग्रॅम २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे ५४,२२० आणि ४९,७०० रुपये आहे. दिल्लीत २४ आणि २२ कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे ५४,३८० रुपये आणि ४९,८५० रुपये आहे. तर चेन्नईत २४ आणि २२ कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे ५५,२९० रुपये आणि ५०,६९० रुपये आहे. दरम्यान, स्पॉट गोल्डचा दर ०.२ टक्क्यांनी वाढून १,७९६.५३ डॉलर प्रति औंसवर आहे.

दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे एक किलो चांदीचा दर ७०,१०० रुपयांवर आहे. तर चेन्नईमध्ये चांदीचा दर ७३,७०० रुपयांवर आहे. भारताच्या वायदे बाजाराची स्थिती स्पॉट मार्केटपेक्षा खूप वेगळी आहे. शुक्रवारी सोन्याचा वायदा तेजीसह बंद झाला होता. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCEX) वर फेब्रुवारी डिलिव्हरी सोन्याचा भाव ०.१७ टक्क्यांनी वाढून ५४,६१४ रुपयांवर बंद झाला होता. (Gold Prices Today)

गुरुवारी सोन्याने गेल्या ४७ वर्षांतील उच्चांकी दर गाठला होता. १९७५ साली ५४० रुपये तोळे असलेले सोने २२ डिसेंबर २०२२ रोजी थेट ५६ हजार ५०० वर पोहोचले होते.

शुद्ध सोने असे ओळखा?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT