Latest

Gold prices today : सोने, चांदी स्वस्त, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क; Gold prices today : सराफा बाजारात सोने चांदीच्या दरात घसरण झाली आहे. काल मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम ५०,९१४ रुपयांवर बंद झाला होता. त्यात आज १५० रुपयांनी घट झाली. आज बुधवारी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५०,७६४ रुपयांवर खुला झाला. तर चांदीच्या दरात ६९४ रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा प्रति किलो दर ६०,३८३ रुपयांवर आला आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा दर ५६,२०० रुपयांवर पोहोचला होता. सध्याचा दर हा दोन वर्षाच्या तुलनेत १० ग्रॅममागे ५,४३६ रुपयांनी कमी आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, (Gold prices today) बुधवारी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ५०,७६४ रुपये, २३ कॅरेट सोने ५०,५६१, २२ कॅरेट ४६,५०० रुपये, १८ कॅरेट ३८,०७३ रुपये आणि १४ कॅरेट २९,६९७ रुपये होता.

एमसीएक्स सोने घसरले

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. एमसीएक्स सोन्याच्या दरात २२४ घसरण होऊन ते ५०,५३६ रुपयांवर व्यवहार करत आहे. तर चांदीच्या दरात १,०२३ रुपयांची घसरण दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारतही सोन्याच्या दरात घसरण पहायला मिळत आहेत. अमेरिकेत सोन्याचा दर ६.३८ डॉलरच्या घसरणीसह १,८२५ डॉलर प्रति औंस आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT