Latest

Gold price today | सोन्याच्या दरात बदल, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : सोन्याचा दर काल ६० हजारांच्या खाली आला होता. आज शनिवारी त्यात पुन्हा वाढ झाली. गुडरिटर्न्स वेबसाइटनुसार, शनिवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याचा भाव ४३० रुपयांनी वधारुन प्रति १० ग्रॅम (२४ कॅरेट) ६०,६५० रुपयांवर गेला. चांदीचा भाव १,१०० रुपयांनी वाढून प्रति किलो ७४,५०० रुपयांवर पोहोचला आहे. (Gold price today)

दरम्यान, २२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४०० रुपयांनी वाढून ५५,६०० रुपयांवर पोहोचला आहे. मुंबईत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ६०,६५० रुपये आहे, तर कोलकाता आणि हैदराबादमध्ये हा दर ६०,६८० रुपये आहे. दिल्ली, बंगळूर आणि चेन्नईमध्ये २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर अनुक्रमे ६०,८३० रुपये, ६०,७३० रुपये आणि ६१,१०० रुपये आहे.

मुंबईत २२ कॅरेट सोन्याची किंमत कोलकाता आणि हैदराबादमधील ५५,६०० रुपयांच्या बरोबरीने आहे. दिल्ली, बंगळूर आणि चेन्नई येथे २२ कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे ५५,७५० रुपये, ५५,६५० रुपये आणि ५६,००० रुपये एवढा आहे.

दरम्यान, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार (India Bullion & Jewellers Association) काल शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ५९,९७६ रुपयांवर बंद झाला आहे. तर २३ कॅरेट ५९,७३६ रुपये, २२ कॅरेट ५४,९३८ रुपये, १८ कॅरेट ४४,९८२ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा भाव ३५,०८६ रुपयांवर होता. तर चांदीचा दर प्रति किलो ७३,६७७ रुपयांवर बंद झाला होता. (Gold price today)

आंतरराष्ट्रीय सराफा फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव १८ डॉलरने वाढून प्रति औंस १,९६६ डॉलर झाला आहे. अमेरिकेतील अपेक्षेपेक्षा कमकुवत रोजगाराच्या आकडेवारीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दराला उभारी मिळाली आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT