Latest

युवराज सिंग पुन्हा मैदानात उतरणार?; व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिले संकेत

backup backup

भारतीय क्रिकेट संघाचा ३९ वर्षीय माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने लवकरच मैदानात उतरणार असल्याचा म्हटलं आहे. पण तो कोणत्या टूर्नामेंटसाठी मैदानात उतरणार आहे याचा खुलासा त्याने अद्याप केलेला नाही.

युवराज सिंग च्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. त्याला बॅटसह मैदानात पाहणे क्रिकेटप्रेमींना खूप आनंददायी वाटते. लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून युवराज सिंग ला पुन्हा मैदानात कधी उतरणार हे विचारत असतात. त्याच्या चाहत्यांचे हे प्रेम पाहून त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

युवराजने आपल्या इन्स्टाग्रामवरती इंग्लड विरुध्दच्या खेळलेल्या सामन्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात कॅप्शनमध्ये " देव तुमचा मार्ग निश्चित करतात. चाहत्यांच्या विनंतीवरून मी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा मैदानात उतरत आहे. तुमच्या प्रेमाबद्दल आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तुमचे प्रेम नेहमी असेच ठेवा आणि हेच खऱ्या चाहत्यांची निशानी आहे." अस म्हटलं आहे. पण कोणत्या टूर्नामेंटमध्ये खेळणार आहे ते सांगितलेलं नाही.

युवराज सिंगने वर्ष २०१९ मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. निवृत्तीनंतर तो ग्लोबल कॅनडा T20 लीग आणि रोड सेफ्टी सीरीज मध्ये खेळला होता. युवराजने देशासाठी साडे अकरा हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये १९०० धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८७०१ आणि T20 क्रिकेटमध्ये ११७७ धावा केल्या आहेत. गोलंदाजीमध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये नऊ, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १११ आणि T20I क्रिकेटमध्ये २८ विकेट घेतल्या आहेत.

हेही वाचलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT