Latest

Go First Crisis : डीजीसीएला कारवाई करण्यापासून रोखा, ‘गो फर्स्ट’ ची एनसीएलटीकडे याचिका

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिवाळखोरीसाठी अर्ज दिलेल्या 'गो फर्स्ट' एअरलाईन्सने (Go First Airlines) हवाई वाहतूक महासंचलनालयाला पुढील कारवाई करण्यापासून रोखले जावे, अशा विनंतीची याचिका राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे [एनसीएलटी] दाखल केली आहे. दरम्यान कर्जाच्या परतफेडीला तात्पुरती स्थगिती देण्याच्या विनंतीवर कायद्यात अशी तरतूद नसल्याचे एनसीएलटीकडून सांगण्यात आले आहे. (Go First Crisis)

'गो फर्स्ट' चे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने कंपनीने स्वतःहून दिवाळखोरीचा अर्ज दाखल केलेला आहे. कर्जाची पुर्नरचना व्हावी तसेच जुनी देण्यास वेळ मिळावा, असा आमच्या अशिलाचा प्रयत्न आहे, अशी भूमिका गो फर्स्टच्या वकिलांकडून न्यायमूर्ती रामलिंगम सुधाकर आणि तांत्रिक सदस्य एल. एन. गुप्ता यांच्या लवादासमोर मांडण्यात आली. (Go First Crisis)

सध्याच्या परिस्थितीत कंपनीविरोधात डीजीसीएकडून प्रतिकूल आदेश दिले जाऊ शकतात. त्यामुळे कारवाईपासून रोखण्याचे निर्देश दिले जावेत, असेही एनसीएलटीसमोर सांगण्यात आले. मागील 17 वर्षांपासून कार्यरत असलेल्या गो फर्स्टची मालकी वाडिया समूहाकडे आहे. कंपनीचे देणे 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचलेले आहे.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT