Latest

Go First Airline : गो फर्स्ट फ्लाइट्स ‘या’ तारखेपर्यंत रद्द 

सोनाली जाधव
पुढारी ऑनलाईन डेस्क : निधीच्या तीव्र तुटवड्यामुळे गो फर्स्ट एअरलाईनने  (GoFirst Airline) ने ३, ४ आणि ५  मे या रोजीचे  बुकिंग बंद केली आहेत. गो फर्स्टचे विमान अचानक रद्द केल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. तिकीट काढलेल्या प्रवाशांनीही नाराजी व्यक्त केली. यानंतर  गो फर्स्ट एअरलाईनने एक ट्विट करत झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करत येत्या ९ मे पर्यंत  शेड्यूल केलेल्या गो फर्स्ट फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. फ्लाइट रद्द केल्यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. असं म्हंटल आहे. (Go First Airline)
Go First

Go First Airline : गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत

गो फर्स्ट एअरलाईनने यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, "आम्हाला कळवण्यात खेद वाटतो की, ऑपरेशनल कारणांमुळे, ९ मे २०२३ पर्यंत शेड्यूल केलेल्या गो फर्स्ट फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. फ्लाइट रद्द केल्यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. देयकाच्या मूळ पद्धतीवर लवकरच पूर्ण परतावा जारी केला जाईल. आम्ही मान्य करतो की फ्लाइट रद्द केल्यामुळे तुमच्या प्रवासाच्या नियोजनामध्ये व्यत्यय आला असेल आणि आम्ही शक्य तितकी मदत देण्यास वचनबद्ध आहोत. तुमच्या संयमाबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. कृपया आमच्या ग्राहक सेवा केंद्राशी 1800 2100 999 वर संपर्क साधा किंवा आम्ही तुम्हाला कशी मदत करू शकतो हे आम्हाला कळवण्यासाठी आम्हाला feedback@flygofirst.com वर लिहा. टीम गो फर्स्ट

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT