Latest

GDP Affects : युक्रेन युद्धाचा जीडीपीवर होणार परिणाम, रुपयाची घसरण होण्याची शक्यता

backup backup
नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा : रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान सुरु असलेल्या युध्दाचा परिणाम देशाच्या जीडीपीवर होणार असून आगामी काळात रूपयाची घसरणदेखील वाढू शकते, असा अंदाज भारतीय स्टेट बँकेने आपल्या ताज्या अहवालात वर्तवला आहे. स्टेट बँकेने याआधी चालू आर्थिक वर्षात आठ टक्के जीडीपी (GDP Affects) दराचा अंदाज  व्यक्त केला होता, हा अंदाज आता 7.8 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपया 77.5 पर्यंत घसरू शकतो, असे अहवालात म्हटले आहे.

GDP Affects : युक्रेन युद्धामुळे महागाईत वाढ

युक्रेन युद्धामुळे बहुतांश देशातील महागाई वाढू लागली आहे. युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थ तसेच खाद्यान्न श्रेणीतील वस्तूंचे दर प्रामुख्याने भडकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण देखील चालू आहे. घसरण अशीच कायम राहिली तर येत्या जून महिन्यापर्यंत रूपया 77.5 च्या स्तरावर जाऊ शकतो.
जागतिक बाजारात क्रूड तेलाचे दर 130 डॉलर्स प्रती बॅरलच्या आसपास स्थिर राहिले तर चालू वित्तीय तूट साडेतीन टक्क्यांपर्यंत वाढू शकते. युद्धामुळे गुंतवणुकीदारात नकारात्मक भावना आहे.
याचे कारण जागतिक तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्यात रशियाचे योगदान क्रमशः 14 आणि 17 टक्के इतके आहे. विदेशी गुंतवणुकीदारांनी भारतीय बाजारातून गत तिमाहीत दोन लाख कोटी रुपये काढले आहेत, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा
SCROLL FOR NEXT