Latest

Gaya Helicopter Crashed: बिहारच्या गयामध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, पायलट जखमी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय लष्कराचे प्रशिक्षण हेलिकॉप्टर मंगळवारी (दि.५) तांत्रिक बिघाड झाल्याने कोसळले. बिहारमधील गया जिल्हातील बोधगया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बगदाहा गावात ही दुर्घटना घडली. या हेलिकॉप्टर अपघातात २ पायलट जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ते दोघेही लष्करी जवान सुरक्षित आहेत. (Gaya Helicopter Crashed)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशिक्षणादरम्यान लष्कर हेलिकॉप्टरच्या फॅनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही दुर्घटना घडली. 400 फूट उंचीवर उडणारे विमान जमिनीवर कोसळताच मोठा आवाज झाला. हेलिकॉप्टरचा कोसळलेला आवाज ऐकूण स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्थानिकांनी महिला लष्करी अधिकारी आणि मायक्रोलाइट विमानाच्या पायलटला सुखरूप बाहेर काढले. (Gaya Helicopter Crashed)

सतर्क झाल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ओटीए अधिकाऱ्यांना या दुर्घटनेची माहिती दिली. त्यानंतर ऑफिसर ट्रेनिंग अकादमीच्या (OTA) अधिकाऱ्यांचे पथक पोहोचले. त्यांनी या दुर्घटनेतील जखमी लष्कर जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. भारतीय लष्कराच्या क्रॅश झालेले हेलिकॉप्टर लष्कराचे मायक्रोलाइट एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखले जाते. 2022 मध्ये देखील याच गावाजवळ विमान कोसळल्याची घटना घडली होती. (Gaya Helicopter Crashed)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT