Latest

Bhuvneshwar Kumar : भुवनेश्‍वरच्‍या कामगिरीवर गावस्‍कर म्‍हणाले, “१८ चेंडूत ४९ धावा..”

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्‍या टी-20 सामन्यांच्‍या मालिकेतील पहिल्‍या सामन्‍यात मंगळवारी भारताचा ४ विकेटने पराभव झाला. ऑस्‍ट्रेलियामध्‍ये होणार्‍या टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेपूर्वीच्‍या या मालिकेतील खेळाडूंची कामगिरी टीम इंडियासाठी महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे. पहिल्‍या टी-२० सामन्‍यातील अंतिम दोन षटकांमध्‍ये ऑस्‍ट्रेलियाला विजयासाठी १८ धावा हव्‍या होत्‍या. यावेळी. कर्णधार रोहित शर्माने १९वे षटक वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमारला दिले. या षटकात भुवनेश्‍वर कुमारने तब्‍बल १६ धावा दिल्‍या. त्‍याच्‍या या कामगिरीवर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्‍कर यांनी सवाल करत चिंताही व्‍यक्‍त केली आहे.

भुवनेश्‍वर कुमारच्‍या कामगिरीबाबत 'स्पोर्ट्स टुडे'शी बोलताना सुनील गावस्‍कर म्‍हणाले की, टीम इंडियाला वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमारकडून खूप अपेक्षा असतात. मात्र मागील काही सामन्‍यामंध्‍ये तो अधिक धावा देत आहे. मागील पाकिस्‍तान, श्रीलंका आणि ऑस्‍ट्रेलिया यांच्‍या विरूद्धच्‍या सलग तीन सामन्‍यात त्‍याने १९ वे षटक टाकले आहे. त्‍याने या तीन षटकात म्‍हणजे १८ चेंडूत तब्‍बल ४९ धावा दिल्‍या आहेत. याचा अर्थ भुनवेश्‍वरने मागील सलग तीन सामन्‍यात शेवटच्‍या १९ षटकात प्रत्‍येक चेंडूवर तीन धावा दिल्‍या आहेत".

Bhuvneshwar Kumar : भुनवेनश्‍वरकडून खूप अपेक्षा

भुनवेनश्‍वर सारख्‍या अनुभवी आणि प्रतिभावान गोलंदाजाकडून खूप अपेक्षा आहेत. त्‍याने मागील तीन षटकांमध्‍ये ३५ ते -३६ धावा देणे अपेक्षित होते. मात्र त्‍याने तब्‍बल ४९ धावा दिल्‍या असून, हा टीम इंडियासाठी खूपच चिंतेचा विषय असल्‍याचा इशाराही सुनील गावस्‍कर यांनी दिला आहे.

नुकत्‍याच झालेल्‍या आशिया चषक स्‍पर्धेत भुवनेश्‍वर कुमारने पाकिस्‍तान विरूद्धच्‍या सामन्‍यात १९ वे षटक टाकले होते यावेळी त्‍याने १९ धावा दिल्‍या होत्‍या. तर श्रीलंके विरूद्धच्‍या सामन्‍यात १४ धावा दिल्‍या होत्‍या. तर मंगळवारी ऑस्‍ट्रेलिया विरूद्धच्‍या सामन्‍यात त्‍याने तब्‍बल १६ धावा दिल्‍या. त्‍याची गोलंदाजी हा टीम इंडियासमोरील चिंतेचा विषय बनला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT