Latest

खासदार गौतम गंभीर यांना ‘इसिस काश्‍मीर’कडून ठार मारण्याची धमकी

backup backup
माजी क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर यांना दहशतवादी संघटना 'इसिस काश्मीर'कडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.  यासंदर्भात त्‍यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दिल्ली पोलिसांनी गंभीर यांच्या घराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.
इसिस काश्मीरकडून दूरध्वनीद्वारे तसेच ई-मेलच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे गंभीर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे गौतम गंभीर खासदार आहेत. मूळचे दिल्लीकर असलेले गंभीर दोनवेळा वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे सदस्य होते.

 गंभीर यांच्‍या सुरक्षेत वाढ

दिल्ली पोलिसांनी गौतम गंभीर यांच्‍या सुरक्षेत वाढ केली आहे.  गौतम गंभीर यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केलेल्या वक्तृत्वामुळे ते नेहमी चर्चेत असतात. नुकतेच त्याने नवज्योतसिंग सिद्धूवर टीका केली होती. गंभीरने सिद्धूला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आपला "मोठा भाऊ" म्हणवून आधी आपल्या मुलांना सीमेवर पाठवा आणि नंतर अशी विधाने करण्यास सांगितले होते.
गौतम गंभीर म्‍हणाले हाेते की, भारत ७० वर्षांपासून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांशी लढत आहे आणि सिद्धूने "दहशतवादी देशाच्या पंतप्रधानांना आपला मोठा भाऊ" म्हणणे "लज्जास्पद" आहे.

हेही वाचलंत का:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT