Latest

बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव यांची रायबरेली लोकसभेच्या निवडणुकीबाबत पोस्ट, म्हणाले…

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही दिवसांपूर्वी काँग्रेसने आपल्या 'एक्स' हँडलवर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या मोबाईलवर बुद्धिबळ खेळतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये राहुल गांधी रशियन ग्रँडमास्टर गॅरी कास्पारोव्हला त्यांचा आवडता बुद्धिबळपटू म्हणून सांगत होते. ते म्हणाले होते की, बुद्धिबळ आणि राजकारणात अनेक साम्य आहेत. आता यावर गॅरीने राजकारण आणि बुद्धिबळावर आपले मत 'एक्स'वर व्यक्त केले आहे. Rae Bareli Lok Sabha Election

मला अगदी सुटका झाल्यासारखे वाटत आहे की, गॅरी कास्पारोव्ह आणि विश्वनाथन आनंद लवकर निवृत्त झाले. त्यांना आमच्या काळातील सर्वात महान बुद्धिबळपटूचा सामना करावा लागला नाही, अशी पोस्ट एका युजरने केली होती. त्यावर गॅरी यांनी खोचक प्रत्युत्तर दिले आहे. Rae Bareli Lok Sabha Election

इतिहास असं सांगतो की तुम्हाला जर सर्वोच्च स्थानी पोहोचायचं असेल, तर तुम्हाला रायबरेलीतून जिंकावे लागते, अशी पोस्ट गॅरी यांनी केली आहे. राहुल गांधींनी रायबरेलीतूनच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यासंदर्भात त्यांच्यावर भाजपाकडून खोचक टीका केली जात आहे. आधीच्या यूजरने त्यांच्याबाबतच खोचक पोस्ट केली आहे. त्यावरच गॅरी यांनी राहुल गांधींच्या संदर्भात उत्तर दिल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या उत्तरानंतर काही तासांत गॅरी यांनी आपल्याच पोस्टवर पुन्हा रिप्लाय दिला आहे. "मला आशा आहे की, माझा हा छोटासा विनोद भारतातील राजकारणावरील तज्ज्ञ भूमिका म्हणून मान्य होणार नाही. पण मला याआधीही 'एक हजारो डोळ्यांनी सारं काही पाहणारा दानव' असे म्हटले गेले आहे. त्यावरून सांगतो, माझ्या आवडत्या खेळात जर एखादा राजकारणी वरवरच्या चाली खेळत असेल. तर ते माझ्या नजरेतून सुटू शकत नाही, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

अमेठी व रायबरेली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचे पारंपरिक गड मानले जातात. राहुल गांधी यांनी अमेठीऐवजी रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर वायनाडमधूनही ते निवडणूक लढवत आहेत. यावरून भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर टीका केली जात आहे. आता बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्ह यांनीही राहुल गांधींच्या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे टिप्पणी केल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT