Latest

अखेर जनता दल मंत्री सतेज पाटील यांच्यासोबत!

रणजित गायकवाड

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लजमधील जनता दल कोणाला पाठिंबा देणार अशी चर्चा गेले महिनाभर रंगलेली होती. एक गठ्ठा पंधरा संख्येने असलेले मतदान मंत्री सतेज पाटील यांना की, अमल महाडिक यांना मिळणार याबाबत बरेच तर्कवितर्क सुरू होते. अ‍ॅड. शिंदे यांची ना. पाटील यांनी पहिल्यांदा भेट घेतल्याबरोबर महाडिक यांनीही गाठी-भेटी घेत यावेळीही आपल्या सोबत राहण्याची विनंती जनता दलाला केली होती. मागीलवेळी जनता दलाने महाडिक यांच्यासोबत जाणे पसंत केल्याने या निवडणुकीत जनता दल काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एक गठ्ठा १५ मते असल्याने जनता दलाला विशेष महत्व प्राप्त झाले होते.

अखेर जनता दलाचे नेते अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी बुधवारी दुपारी १ च्या सुमारास जनता दलाचे सर्व नगरसेवक ना. पाटील यांच्या पाठींशी एकमुखी असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी ना. पाटील यांनी जनता दलाने एकमुखी दिलेल्या पाठिंब्यांने २७० आकड्यावर पोहचलो असून जनता दलाचा पाठिंबा व विजय हे वेगळे गणित असल्याने सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी आगामी काळात पालिकेसाठी भरीव विकास निधी द्यावा अशी मागणी केली. यावेळी जनता दलाचे सर्व १५ नगरसेवक उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT