Latest

Gadar 2 Collection: ५ दिवसांत २०० कोटी पार, OMG २ ला टाकले मागे

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सनी देओल-अमीषा पटेल यांची सीमेपलिकडील प्रेम कहाणी 'गदर २' (Gadar 2 Collection) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने अनेक हिट चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहे. १५ ऑगस्ट रोजी या चित्रपटाने सर्वाधिक कलेक्शन केल्याचा दावा केला आहे. पाच दिवसात २०० कोटींचा गल्ला जमवला असल्याची माहिती समोर आलीय. (Gadar 2 Collection)

चित्रपटगृहात धमाकेदार कलेक्शन करत आतापर्यंत एकूण २२८.९८ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. हा चित्रपट दिग्दर्शक-निर्माते अनिल शर्मा दिग्दर्शित आणि झी स्टुडियोजद्वारा निर्मित आहे. सुपरस्टार सनी देओल आणि अमीषा पटेल मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या OMG 2 ला टक्कर देताना हा चित्रपट दिसत आहे.

अक्षय कुमारच्या ओएमजी २ ने १५ ऑगस्टला चांगला बिझनेस केला. ओएमजी २ ने मंगळवारी देशभरात १७.१० कोटींचे नेट बिझनेस केला आहे. डोमेस्टिक बॉक्स ऑफिसवर लाईफटाईम कलेक्शन ७२.२७ कोटींवर पोहोचला आहे. ओएमजी २ लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचेल, असा अंदाज बांधता येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT