Latest

G20 New Delhi summit: जी-२० मध्ये मोदींच्या १५ द्विपक्षीय बैठका 

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: जी – २० शिखर परिषदेसाठी आलेल्या जागतिक नेत्यांसमवेत येत्या तीन दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंधराहून अधिक द्विपक्षीय बैठका होणार आहेतयामध्ये अमेरिकाफ्रान्सइंग्लंडजर्मनीइटली या प्रमुख देशांचा समावेश आहेयात व्यापारआर्थिकतंत्रज्ञान या क्षेत्रांमधील परस्पर सहकार्याचा आढावा घेण्याबरोबरच दहशतवादाला प्रतिबंधसामरिक सुरक्षा आणि वैश्विक पातळीवरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर देखील चर्चा होईल. द्विपक्षीय बैठकांच्या नियोजनाअंतर्गत आज (दि.९ सप्टेंबर) मॉरिशस आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांसमवेत पंतप्रधान मोदींचा द्विपक्षीय वार्तालाप होणार आहेत्यानंतर सायंकाळी अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्यासमवेत बैठक होईल. (G20 New Delhi summit)

G20 New Delhi summit: आजच्या द्विपक्षीय बैठका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथबांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आणि  राष्ट्रपती बायडेन यांच्यासमवेत होणाऱ्या आजच्या द्विपक्षीय बैठकांबद्दल सोशल मिडियावरून माहिती दिलीया देशांसमवेत भारताचे संबंध आणि विकासासाठीचे सहकार्य आणखी दृढ करण्याची संधी द्विपक्षीय बैठकांमधून मिळेलअसेही मोदींनी म्हटले आहे. (G20 New Delhi summit)

९ सप्टेंबरच्या द्विपक्षीय बैठका

दरम्यान,  उद्या (९ सप्टेंबरलाजी२० बैठकीव्यतिरिक्त इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनकजपानचे चॅन्सलर ओलाफ शोल्झइटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासमवेत स्वतंत्र द्विपक्षीय बैठकांमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी होतील. (G20 New Delhi summit)

१० सप्टेंबरला होणाऱ्या बैठका

१० सप्टेंबरलाही द्विपक्षीय बैठकांचे सत्र सुरूच राहणार आहेयामध्ये फ्रेंच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होणार आहेत्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यासमवेत वार्तालापतसेच कोमोरोसतुर्कियेसंयुक्त अरब अमिरातदक्षिण कोरियाब्राझील आणि नायजेरियाच्या राष्ट्रप्रमुखांसमवेत त्याचप्रमाणे युरोपीय महासंघाच्या अध्यक्षा उर्सूला वोन डेर लेयेन यांच्यासमवेतही पंतप्रधान मोदी द्विपक्षीय बैठकांमध्ये चर्चा करतील.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT