Latest

G-20 बैठकीत रशियाने भारताची जाहीर माफी का मागितली ?

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी गुरुवारी G-20 बैठकीत पाश्चात्य देशांच्या 'अशोभनीय वर्तन'बद्दल भारताची माफी मागितली आहे. G-20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत आपल्या भाषणादरम्यान ते म्हणाले की, पाश्चात्य देशांनी G-20 चा मुख्य अजेंडा हा एक तमाशा बनवला आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पाश्चात्य देशांमुळे G-20 बैठकीत युक्रेनचा मुद्दा वरचढ ठरला आहे, त्यामुळे G-20 मध्ये भारताने मांडलेले विकासाचे मुद्दे मागे फेकले गेले.

भारताची माफी मागताना लावरोव्ह म्हणाले, 'अनेक पाश्चात्य देशांच्या शिष्टमंडळांच्या असभ्य वर्तनाबद्दल मला यजमान भारताचे आणि ग्लोबल साउथ देशांच्या मित्र राष्ट्रांची माफी मागायची आहे. पाश्चात्य शिष्टमंडळांनी G-20 अजेंडावरील काम एक तमाशा सारखे करुन टाकले आहे.

रशियाची अधिकृत वृत्तसंस्था स्पुतनिकने एका वृत्तात म्हटले आहे की, रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या बैठकीत पाश्चिमात्य देशांनाही फटकारले. ते म्हणाले की, आपल्या आर्थिक अपयशाचे खापर रशियाच्या माथी फोडण्याचे काम पाश्चिमात्य देशांनी केले आहे.

आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी रशिया महत्त्वपूर्ण योगदान देत राहील, असे लाव्हरोव्ह यावेळे म्हणाले. ते पुढे म्हणाले, G-20 मध्ये आम्ही निष्पक्ष संवादासाठी तयार आहोत. या वर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या दिल्ली शिखर परिषदेमुळे पाश्चात्य देशांचे स्वार्थी धोरण थोडे कमी होईल, अशी आशा आहे.

गुरुवारी झालेल्या G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पहिल्या सत्रा बहुपक्षीयता, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा व सहकार्य यांच्या विकासावर केंद्रित करण्यात आले होते.

पीएम मोदींच्या भाषणाचे कौतुक

बैठकीच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदस्य देशांना मार्गदर्शन करताना संदेश दिला की, बैठकीच्या उर्वरित अजेंड्यावर रशिया-युक्रेनचा वरचढ होऊ नये.

पीएम मोदी पुढे म्हणाले, 'आपण तीव्र मतभेदांच्या काळात भेटत आहोत. हे मतभेद कसे सोडवता येतील याविषयी आपल्या सर्वांचे स्वतःचे मत आणि आपला स्वतःचा एक दृष्टीकोन आहे. तथापि, जगातील आघाडीची अर्थव्यवस्था या नात्याने, G-20 चे सदस्य नसलेल्या देशांप्रतीही आपली जबाबदारी आहे.

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, 'रशियाचे भारतासोबतचे संबंध 'विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी' म्हणून पाहिले जातात. हे आमच्या नात्याचे खास वैशिष्ट्य दर्शवते. प्रमुख जागतिक अजेंड्यावर भारताच्या जबाबदार भूमिकेचे कौतुक केले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या मार्गदर्शनाचे रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी कौतुक केले आहे. ते म्हणाले, 'आज जी-20 बैठकीला मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदींनी संतुलित आणि जबाबदार भूमिका मांडली. पाश्चिमात्य देश भू-राजकीय चित्रात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत पण पंतप्रधान मोदी सर्व मुद्द्यांवर समतोल पद्धतीने बोलले.


अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT