Latest

Tadoba-Andhari व्याघ्र प्रकल्पात कोअर व बफर झोनमध्ये आता दिवसभर सफारी

नंदू लटके

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा-देशात नावालौकीक असलेल्या चंद्रपूर जिल्हयातील ताडोबा अंधारी ( Tadoba-Andhari ) व्याघ्र प्रकल्पात यापूर्वी एका विशिष्ठ वेळेत सफारीचा आनंद पर्यटकांना घेता येत होता; परंतु आता ताडोबाच्या बफर व कोअर झोनमध्ये दिवसभरही सफारी करता येणार असल्याने पर्यटकांची पर्वणी आहे. रविवारपासून दिवसभराच्या सफारीचा शुभारंभ करण्यात आला.

देशात नावालौकीक असलेला चंद्रपूर जिल्हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाकरीता प्रसिध्द आहे. राजकीय नेत्यांपासून तर सेलिब्रिटीपर्यंत सारेच वर्षभर या प्रकल्पात वाघांच्या दर्शनाकरीता येत असतात. मात्र त्यावेळी व्याघ्रप्रकल्पात फक्त सकाळी व सायंकाळीच प्रवेश दिला जात होता. मात्र आता दिवसभरही ताडोबाच्या बफर व कोअर झोनमध्ये सफारीचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे.

Tadoba-Andhari : प्रायोगिक तत्त्वावर दिवसभर पर्यटन सफारीला सुरुवात

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये रविवारपासून प्रायोगिक तत्त्वावर दिवसभर पर्यटन सफारीला सुरुवात झाली. या जिप्सीत केवळ चार पर्यटक असतील. बफर झोनचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांच्या उपस्थितीत सफारीचा शुभारंभ करण्यात आला.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोअर झोनपाठोपाठ बफर झोनमध्ये दिवसभर सफारीला सुरुवात करण्यात आली. दिवसभर सफारी सुरू करू नये, अशी मागणी जिल्ह्यातील वन्यजीवप्रेमी व पर्यावरणवाद्यांनी केली होती. मोहर्ली बफर झोन अंतर्गत देवाडा-आगरझरी, जुनोना-अडेगाव या मार्गाने दिवसभर सफारीचा शुभारंभ झाला. ताडोबा कोअर झोनमध्ये एका दिवसाला तीन जिप्सी दिवसभरासाठी सोडण्यात येत आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT