Latest

fukrey 3 : ‘फुकरे ३’ ची बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई; ‘राष्ट्रीय चित्रपट दिना’ची लॉटरी

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट, ऋचा चढ्ढा, पंकज त्रिपाठी, वरुण शर्मा आणि मनजोत सिंग यासारख्या दिग्गज कलाकारांचा 'फुकरे ३' ( fukrey 3 ) हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी रिलीज झाला. रिलीज होताच चित्रपटाने केवळ भारताताच नाही तर जगभरातील चाहत्यांना वेड केलं. यासोबत 'फुकरे ३' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत वर्ल्ड वाइड कलेक्शन १०० कोटींच्या जवळपास जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान चित्रपटातील चारही कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केलं जात आहे.

संबधित बातम्या

२८ सप्टेंबर रोजी रिलीज झालेल्या 'फुकरे ३' ( fukrey 3 ) या चित्रपटाला फक्त १५ दिवस उलटले आहे. म्हणजे, अवघ्या दोन आठवड्यांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोष ८१. २४ कोटींची कमाई केली आहे. आता या चित्रपटाला विकेंड म्हणजे शनिवार, रविवारचा आणि राष्ट्रीय चित्रपट दिन २०२३ चा जबरदस्त फायदा होणार आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यांत जोरदार कलेक्शन केले. परंतु, दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत थोडीशी घसरण होत गेली. दरम्यान या तिसऱ्या आठवड्यात १०० कोटींचा आकडा पार करेल अशी निर्मात्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबरला म्हणजे, पहिल्या दिवशी ८.८२ कोटी, दुसऱ्या दिवशी ७. ८१ कोटी, तिसऱ्या दिवशी ११. ६७ कोटी, चौथ्या दिवशी १५.१८ कोटी, पाचव्या दिवशी ११. ६९ कोटी, सहाव्या दिवशी ४.११ कोटी, सातव्या दिवशी ३.६२ कोटी, आठव्या दिवशी ३.१२ कोटी, नवव्या दिवशी २.३१ कोटी, दहाव्या दिवशी ४.०२ कोटी, अकराव्या दिवशी ४.११ कोटी, बाराव्या दिवशी १.४१ कोटी, तेराव्या दिवशी १.३० कोटी चौंदाव्या दिवशी १. १४ कोटी आणि शेवटच्या पंधराव्या दिवशी १ कोटी असे मिळून एकूण ८१. २४ कोटींची कमाई चित्रपटाने केली आहे.

याच दरम्यान हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यात जवळपास १०० कोटींचा आकडा पार करेल अशी आशा आहे. कारण विकेंडसोबत राष्ट्रीय चित्रपट दिन या आठवड्यात असल्याने चित्रपट पाहणाऱ्याची संख्या वाढली जाणार आहे. ही एक प्रकारची चित्रपटासाठी लॉटरीच असणार आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT