Latest

फॉक्सकॉन बनवणार Apple साठी एअरपॉड्स, भारतात उभारणार प्लांट, २०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : तैवानची कॉन्ट्रॅक्ट मॅन्यूफॅक्चर फॉक्सकॉनला (Foxconn) अॅपल इंक (Apple Inc) साठी एअरपॉड्स बनवण्याची ऑर्डर मिळाली आहे. तसेच या कंपनीने आता वायरलेस इयरफोन्स तयार करण्यासाठी भारतात कारखाना उभारण्याची योजना आखली आहे. अधिकृत सुत्रांच्या हवाल्याने रॉयटर्सने याबाबत वृत्त दिले आहे.

या करारामुळे जगातील सर्वात मोठी कॉन्ट्रॅक्ट इलेक्ट्रॉनिक्स निर्माता आणि सर्व iPhones पैकी ७० टक्के असेंब्लर असलेली Foxconn प्रथमच AirPod चा पुरवठा करणार आहे. सध्या एअरपॉड्स चिनी पुरवठादारांकडून बनवले जातात. पण आता ही कंपनी Apple ची AirPod पुरवठादार बनणार आहे. विशेष म्हणजे हे उत्पादन चीनपासून दूर भारतात घेतले जाणार आहे.

एका सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, फॉक्सकॉन दक्षिण भारतातील तेलंगणामधील न्यू इंडिया एअरपॉड प्लांटमध्ये २०० दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक करणार आहे. नेमकी एअरपॉड ऑर्डर कितीची असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डिव्हाइस बनवताना तुलनेने कमी नफ्याच्या मार्जिनमुळे एअरपॉड्स असेंब्ल करायचे की नाही याबद्दल फॉक्सकॉनच्या अधिकाऱ्यांनी प्रदीर्घ चर्चा केली. पण शेवटी Apple ला एअरपॉड्स पुरविण्याचे निश्चित करण्यात आले. दरम्यान, भारतातच हे उत्पादन घेण्याची विनंती ॲपलने केली होती, असेही सुत्रांनी म्हटले आहे.

२०२४ च्या अखेरीस उत्पादन सुरू होणार

जगातील सर्वात मौल्यवान कंपनी Apple कडून अधिक ऑर्डर मिळवण्याच्या शर्यतीत फॉक्सकॉन सोबत विस्ट्रॉन कॉर्प आणि पेगाट्रॉन कॉर्प सारख्या तैवानच्या कंपन्या होत्या. फॉक्सकॉन इंटरकनेक्ट टेक्नॉलॉजी लिमिटेड या उपकंपनीने या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत तेलंगणामध्ये उत्पादन सुविधा उभारण्याची आणि २०२४ च्या अखेरीस उत्पादन सुरू करण्याची योजना आखली आहे.

Apple आणि त्याचे प्रमुख पुरवठादार उत्पादन चीनपासून दूर हलवत आहेत. कारण चीनमधील कडक COVID-19 प्रतिबंधांमुळे फॉक्सकॉनच्या सर्वात मोठ्या आयफोन उत्पादनात अडचणी आल्या होत्या. चीन आणि अमेरिकेमधील वाढत्या संघर्षामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठीदेखील फॉक्सकॉन त्यांचे उत्पादन चीनपासून दूर हलवत आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT