Latest

Shanghai Corona : चीनच्या शांघायमध्ये कोरोनाचा कहर; रुग्णालये भरली, कडक लॉकडाउनमुळे नागरीक उपाशी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. सोमवारी 16,412 कोरोनाचे संक्रमित रुग्ण आढळले. महामारी सुरू झाल्यापासून चीनमध्ये एका दिवसात इतके रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. सर्वात वाईट स्थिती आर्थिक राजधानी शांघायची आहे. येथे संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोणत्याही कारणाशिवाय लोकांना घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाही. केवळ वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतच घरातून बाहेर पडता येते. (Shanghai Corona)

सोमवारी शांघायमध्येही कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी मास टेस्टिंग करण्यात आली. येथील सर्व 2.6 कोटी लोकसंख्येची चाचणी घेण्यात आल्याचे समजते. शांघायचे आरोग्य अधिकारी लोकांच्या न्यूक्लिक अॅसिड चाचण्या घेत आहेत. या चाचणीत चुकीचा निकाल लागण्याची शक्यता नगण्य आहे, या चाचणीत कमी प्रमाणातील कोविडाचा संसर्ग समजतो. (Shanghai Corona)

शांघायच्या स्थानिक प्रशासनाने सोमवारी सांगितले की, येथे कडक कारवाई केली जात असून लोकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वैद्यकीय आणीबाणी वगळता कोणालाही कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. सोमवारी सर्व तपासणी करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. (Shanghai Corona)

शांघायमध्ये लष्कर रस्त्यावर

शांघायमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करालाही रस्त्यावर उतरवण्यात आले आहे. येथे लष्कराचे दोन हजारांहून अधिक जवान उपस्थित आहेत. तसेच शांघायच्या विमानतळावर लष्कराची विमाने लँड होत असल्याचे एका व्यक्तीने वृत्तसंस्थेला सांगितले आहे. (Shanghai Corona)

चीनमधील सर्वात मोठे शहर शांघायमध्ये कोविड-19 च्या रुग्णांमध्ये वाढत होत आहे. लॉकडाऊनमुळे लाखो लोक घराबाहेर पडत नाहीत. रविवारी उत्तर-पूर्व प्रांत जिलिनमध्ये कोरोना विषाणूची एकूण 4,455 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, जी शनिवारी नोंदवलेल्या प्रकरणांपेक्षा जास्त आहे. ही संख्या अनेक देशांच्या तुलनेत कमी आहे, परंतु 2019 च्या उत्तरार्धात वुहानमध्ये आढळलेल्या प्रकरणांनंतर चीनमध्ये दररोजची प्रकरणे सर्वाधिक आहेत. (Shanghai Corona)

चीनमधील (China) आर्थिक केंद्र असलेल्या शांघायमध्ये (Shanghai) कोरोनाचा (Covid) उद्रेक झाला आहे. रविवारी येथे ८ हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर चीनने सोमवारी २ कोटी ६० लाख लोकांची चाचणी करण्यासाठी शांघायमध्ये सैन्य आणि हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांना पाठवले आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईतील चीनमधील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी मोहीम आहे. (Shanghai Corona)

पीपल्स लिबरेशन आर्मी (The People's Liberation Army) ने रविवारी सैन्य, नौदल आणि संयुक्त लॉजिस्टिक सपोर्ट फोर्समधून भरती केलेल्या २ हजारहून अधिक वैद्यकीय कर्मचार्‍यांना शांघायला पाठवले आहे, असे वृत्त सशस्त्र दलाच्या एका वृत्तपत्राने दिले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिआंग्सू, झेजियांग आणि बीजिंग यासारख्या अनेक प्रांतांनी आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचार्‍यांना शांघायला पाठवले आहे. शांघायला पाठवण्यात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची एकूण संख्या १० हजारांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

चीनमधील (China Covid) वुहानमध्ये पहिल्यांदा २०२० मध्ये कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यानंतर जगभरात कोरोना पसरला. या पार्श्वभूमीवर शाघांयला कोरोनातून बाहेर काढण्यासाठी चीन सरकारने मोठी मोहीम राबवली आहे. शाघांयमध्ये दोन टप्प्यांत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लोकांना त्यांच्या घरीच राहण्यास सांगण्यात आले आहे. आता येथे nucleic acid चाचणी केली जात आहे.

चीनचे आर्थिक केंद्र असलेल्या शांघायमध्ये कोरोना संसर्गाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे २५ दशलक्ष लोकांना घरी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून संसर्ग नियंत्रित करता येईल. शिपिंग दिग्गज मार्सकने शुक्रवारी सांगितले की, शहरातील काही डेपो बंद आहेत. लॉकडाऊनमुळे ट्रकसेवा आणखी प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT