Latest

Pune -Bangalore Highway Accident : पुणे -बंगळुरू महामार्गावर भीषण अपघातात तीन ठार

backup backup

पुणे- बंगळुरू महामार्गावरील अपघातांचे सत्र काही केल्याने थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाही. नवीन कात्रज बोगदा पासून नवले ब्रिज परिसर अपघात प्रवण क्षेत्र बनला आहे. गुरुवारची घटना ताजी असतानाच आज (दि.२२) परत पुणे बंगळुरू महामार्गावर नर्हे परिसरात भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून, या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर १२ ते १३ लोक जखमी झाले आहेत. (Pune -Bangalore Highway Accident)

थिनर घेऊन जाणाऱ्या टँकरने समोरील १५ ते १६ वाहनांना उडवत फरफटत नेले असून, घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Pune -bangalore Highway Accident : टँकरने जवळपास १५ ते १६ वाहनांना उडवले

मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूकडून पुण्याकडे येत असलेल्या थिनर घेऊन जाणाऱ्या टँकरचे या उतारावर आल्यानंतर नियंत्रण सुटले आणि त्याने समोरील वाहनांना उडविण्यास सुरुवात केली. टँकरने जवळपास १५ ते १६ वाहनांना उडवले. तर काही वाहनांना फरफटत नेले. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. पोलीस, अग्निशमन दल येथे दाखल झाले आहे. त्यानी वाहने दोन्ही बाजूने बंद केली आहेत. थिनरचा टँकर असल्याने जमावाला बाजूला करण्यात आले आहे. तर अग्निशमन दलाच्या जवान मदत करून वाहने बाजूला करत आहेत.

SCROLL FOR NEXT