Latest

Maharashtra politics | ठाकरे गटातून आऊटगोईंग सुरुच, राऊतांच्या निकटवर्तीयांचा शिंदे गटात प्रवेश

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात इनकमिंग सुरुच आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे मुंबईतील विक्रोळी विभागातील कन्नमवार नगरचे माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सावंत यांनी पक्ष प्रवेश केला. उपेंद्र सावंत हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. यावेळी शिंदे यांनी त्यांचे शिवसेनेमध्ये स्वागत करून त्यांना भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याबाबतची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट करुन दिली आहे. (Maharashtra politics)

यावेळी बोलताना सावंत यांनी गेले दीड वर्षे आपल्या प्रभागात एकही विकासकाम होऊ शकले नसल्याने व्यथित होऊन आपण शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत असल्याचे सांगितले. शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या नगरसेवकांची संख्या आता ३३ झाली असून त्यातील २५ हे ठाकरे गटाचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (Maharashtra politics)

ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिले त्याच लोकांची कामे करणे शक्य होत नसेल, विकासकामे होत नसतील तर नगरसेवक काय करणार..? त्यामुळेच अनेक नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी स्पष्ट केले असल्याचे शिंदे यांनी पुढे म्हटले आहे.

दरम्यान, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यातील शिरूर, आळंदी, तळवडे, राजगुरूनगर येथील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. तर शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या पुढाकाराने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, माजी सरपंच यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला असल्याचे शिंदे यांनी नमूद केले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT