Latest

Foreign Currency : देशाच्या विदेशी चलन साठ्यात 5.9 अब्ज डॉलर्सने वाढ

backup backup

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली, दि. 9 : Foreign Currency : सलग दोन आठवडे विदेशी चलन साठ्यात घसरण झाल्याच्या पार्श्वभूमीवर 2 जून रोजी संपलेल्या आठवड्यात हा साठा 5.9 अब्ज डॉलर्सने वाढला आहे. रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी ही माहिती देण्यात आली.

दोन आठवड्यात विदेशी चलन साठ्यात एकूण 4.34 अब्ज डॉलर्सची घट होत हा साठा 589.14 अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता. मात्र 2 जून रोजी संपलेल्या आठवड्यात हा साठा 5.9 अब्ज डॉलर्सने वाढून 595.06 अब्ज डॉलर्सवर गेला आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये विदेशी चलन साठा 645 अब्ज डॉलर्सच्या सर्वकालीन उच्चांकी स्तरावर गेला होता. मात्र, त्यानंतर या साठ्यात सातत्याने घट झाली होती. विदेशी चलन साठ्यातील सध्याचे विदेशी चलन मालमत्तेचे प्रमाण 526.20 अब्ज डॉलर्स इतके आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT