Latest

हिमाचल प्रदेशमधील कुलूत ढगफुटी, अनेक गावांना पुराचा तडाखा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
हिमाचल प्रदेश राज्‍यातील कुलू जिल्‍ह्यात ढगफुटी झाली. याचा तडाखा अनेक गावांना बसला आहे. अनेक घरांची पडझड झाली असून, मणिकर्णमधील अनेक टुरिस्‍ट कॅम्‍पचेही नुकसान झाले आहे. अतिवृष्‍टीमुळे मणिकर्ण खोर्‍यात पूर आला आहे. नागरिकांना सुरक्षित स्‍थळी हलविण्‍यास प्रशासनाने प्राधान्‍य दिले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कुलूचे पोलीस अधीक्षक गुरदेव शर्मा यांनी सांगितले की, कुलू जिल्‍ह्यात अतिवृष्‍टीमुळे पुरस्‍थिती निर्माण झाली आहे. आपत्ती निवारण दल नागरिकांना सुरक्षित स्‍थळी हलवत आहे. आतापर्यंत सहा नागरिक बेपत्ता असल्‍याची नोंद झाली असून, त्‍यांचा शोध सुरु आहे. सात घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तर तीन प्रकल्‍पांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्‍टीमुळे धरणातील विसर्ग बंद करण्‍यात आला आहे. तसेच नदीकाठी जाण्‍यापासून प्रतिबंध करण्‍यात आल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

मणिकर्णमध्‍ये अतिवृष्‍टीमुळे मोठे नुकसान

मणिकर्णमध्‍ये अतिवृष्‍टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक टुरिस्‍ट कॅम्‍पचे आणि घरांची पडझड झाली आहे. येथील सहा जण बेपत्ता आहेत. येथे आपत्तकालीन पथकाचे मदत कार्य सुरु आहे. ढगफुटी झाल्‍याने नदीच्‍या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. पार्वती नदीची पाणीपातळीत वाढ झाल्‍याने पुराचा धोका वाढला आहे. अनेक गावांमधील जनजीवन विस्‍कळीत झाले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT