Latest

Firecracker factory : फटाका कारखान्‍यात स्‍फोट; मृतांचा आकडा वाढला, ९ ठार

सोनाली जाधव

 पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्‍ह्यात मंगळवारी (दि.१६) सकाळी अकराच्या सुमारास फटाक्याच्या कारखान्यात  स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, त्यात तिघांचा  मृत्यू झाला होता. अद्ययावत माहितीनूसार अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. हा आकडा आता ९ वर गेला आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले असून, या स्फोटाचे कारण अद्‍याप स्‍पष्‍ट झालेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. (Firecracker factory )

मृतांचा आकडा नऊ

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे सोपवल्यानंतर, कोलकाता येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) पथक मंगळवारी रात्री ९.४५ वाजता घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू केला. एसपी म्हणाले, "आतापर्यंत नऊ मृतदेह सापडले आहेत आणि या घटनेत आणखी कोणाचा मृत्यू झाला आहे का हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे." एसएसकेएमला संदर्भित केले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पूर्व मेदिनीपूर जिल्‍ह्यातील इग्रा परिसरात हा फटाका कारखाना होता. तो बेकायदेशीर होता. स्फोटाचा धक्का इतका जोरदार होता की निवासी इमारतीत सुरू असलेला कारखाना कोसळला.

Firecracker factory : वारंवार घटना

यापूर्वीही अश्या स्फोटाच्या घटना घडल्या आहेत.  २० मार्च रोजी दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील महेशतला येथे फटाक्यांच्या युनिटला लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला होता. डिसेंबर २०२२ मध्ये पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील भूपतीनगर येथे फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात तीन जण ठार झाले होते.

भाजपने केली 'एनआयए' तपासाची मागणी

दरम्यान, पश्‍चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी या संपूर्ण घटनेची राष्‍ट्रीय तपास संस्‍थेकडून ( एनआयए ) चौकशीची मागणी केली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. ममता सरकारने संपूर्ण राज्याला बॉम्ब आणि बंदूक बनविण्याच्या कारखान्यात रूपांतरित केले आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT