Latest

Air India Fire : मस्कत विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला आग, सर्व 141 प्रवासी सुरक्षित (Video)

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Air India Fire : एअर इंडियाच्या विमानात आग लागल्याची घटना समोर आली आहे. ओमानच्या मस्कत अंतरराष्ट्रीय विमानतळावर ही दुर्घटना घडली. एअर इंडियाचे विमान मस्कतमध्ये उड्डाणासाठी सज्ज असताना अचानक त्यातून धूर येऊ लागला. यानंतर तातडीने सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. हे विमान बुधवारी (दि. 14) सकाळी मस्कत विमानतळावरून भारतातील कोचीकडे रवाना होणार होते. मात्र, उड्डाणापूर्वीच हा अपघात झाला. एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट IX-442, VT-AXZ मध्ये 141 प्रवासी होते. त्याच वेळी, क्रूमध्ये 6 सदस्य होते. सर्व सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

मस्कत-कोची एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइटमधून धूर निघताना दिसल्यानंतर त्यांना तात्काळ आपत्कालीन स्थितीत हलवण्यात आले. प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी स्लाइड्सचा वापर करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ओमानमधील स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, या अपघातात सुमारे 14 लोक जखमी झाले आहेत. काही वेळानंतर गुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवाशांसाठी दुस-या एका विमानाची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, एअर इंडियाच्या विमानात असं काय घडलं ज्याने धुर येऊ लागला? या प्रश्नाचा शोध घेतला जात असल्याचेही अधिका-याने स्पष्ट केले. (Air India Fire)

एअर इंडियाने नुकतीच एक महत्त्वाची घोषणा केली होती. एअर इंडियाने सध्याच्या ताफ्यात 25 नॅरो-बॉडी एअरबस आणि 5 बोईंग वाइड-बॉडी विमानांचा समावेश करण्याची योजना आखली आहे. यामुळे एअर इंडियाच्या ताफ्यात 25 टक्क्यांहून अधिक वाढ होईल, असे बोलले जात आहे. यापूर्वी 25 ऑगस्ट रोजी सिडनीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे कोलकात्यात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. मात्र, 50 वर्षीय प्रवाशाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. (Air India Fire)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT