Latest

shivlila : शिवलीला पाटलांच्या किर्तनास वारकऱ्यांचा विरोध; आयोजकांवर गुन्हा दाखल

स्वालिया न. शिकलगार

देऊळगाव राजा (बुलडाणा) : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने शिवलीला पाटील (shivlila) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शिवलीला पाटील (shivlila) या बिग बॉस मराठी सिझन ३ च्या माजी स्पर्धक आहेत. त्या कीर्तनासाठी आल्या होत्या. यावेळी प्रचंड गर्दी झाली. दुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना हे आयोजन महागात पडले. याप्रकरणी तिघांविरुद्ध बुलडाणा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

दरम्यान पाटील यांच्या कीर्तनास जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने विरोध दर्शवला. पण, आयोजकांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत कीर्तनाचे आयोजन केले.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी जमवू नये. असे आदेश बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी दिले होते. देऊळगाव मही येथील राजमाता जिजाऊ दुर्गा मंडळ यांच्या वतीने पाटील यांचे कीर्तन आयोजित केले. यावेळी कीर्तनास २०० हून अधिक लोक जमले.

याबाबत पोलिस उपनिरीक्षक किरण खाडे यांनी सरकारतर्फे पोलिसात तक्रार दिली. मंडळाचे आयोजक संदीप राऊत, गणेश साहेबराव गोरे व किशोर पोफळकर (रा. देऊळगाव मही) यांच्याविरुद्ध गन्हा दाखल केला. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.

'बिग बॉसमध्ये गेले ही माझी चूक'

यावर कीर्तनकार पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या-बिग बॉसमध्ये गेले ही माझी चूक. मात्र, आपल्या धर्माची संस्कृती आपल्या संप्रदाय माझे कीर्तन माझी तुळशी माय अख्ख्या महाराष्ट्राला दिसावी म्हणून मी बिग बॉसमध्ये गेले. मात्र, तिथं राहून मी वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविले. मी अभंगावर बोलले. ज्ञानेश्वरी वाचन तुळशी पूजन सोडले नाही. वारकरी संस्कृती जपली. पण, एक महिला कीर्तनकार आहे. म्हणून विरोध होत असल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान, शिवलीला पाटील प्रकृती अस्वास्थ्यामुळे घराबाहेर झाल्या.

हे वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT