पुढारी ऑनलाईन डेस्क : नयनताराचा चित्रपट 'अन्नपूर्णी' वादात सापडला आहे. प्रभू श्रीराम यांच्याविषयी (Nayanthara) अपमानजनक डायलॉग आणि हिंदु बांधवांच्या भावना दुखावल्याने तिच्याविरोधात मध्य प्रदेशातील जबलपूर येथे एफआयआर दाखल करण्यात आले आहे. (Nayanthara)
संबंधित बातम्या –
नेटफ्लिक्सवरील रिलीज झालेल्या 'अन्नपूर्णी' चित्रपटावरून वाद सुरू झाला आहे. 'अन्नपूर्णी' मध्ये भगवान श्रीराम यांचा अपमान आणि हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे. काही नेटकरी हा चित्रपट अँटी हिंदू असल्याचं म्हटलं जात आहे. चित्रपटाच्या निर्मात्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आले आहे. मुंबईनंतर आता मध्य प्रदेशातील जबलपूरमध्येदेखील चित्रपटाचे निर्माते आणि संपूर्ण स्टारकास्ट विरोधात एका संघटनेने तक्रार दाखल केली आहे.
हिंदू सेवा परिषदाचे अतुल जेसवानी यांनी पोलिसात तक्रार करताना सांगितले की, चित्रपटामध्ये असे अनेक सीन आहेत, जे हिंदू धर्माचे आराध्य मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचे अपमान करतात. चित्रपटामध्ये भगवान राम यांच्याविरोधात अनेक टिप्पणीमुळे हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. चित्रपटामध्ये लव जिहाददेखील दाखवण्यात आले आहे.