Latest

GT vs MI : तिकिटासाठी झुंबड, धक्काबुक्की अन् मारामारीही

Shambhuraj Pachindre

अहमदाबाद; वृत्तसंस्था : गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील दुसर्‍या क्वॉलिफायर सामन्याआधी येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमबाहेर मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या सामन्याचे तिकीट मिळावे म्हणून लोक इतके वेडे झाले होते की, रांगेमध्ये धक्काबुक्की आणि मारामारी झाली. (GT vs MI)

मुंबई आणि गुजरात यांच्यातील क्वॉलिफायर-2 या सामन्याचे तिकीट घेण्यासाठी चाहत्यांनी लांबच-लांब रांगा लावल्या होत्या. या गर्दीचे असेही काही व्हिडीओ समोर आले आहेत, जे पाहून कोणीही घाबरून जाईल. कारण या सामन्याच्या तिकिटासाठी रांगेत चक्क मारामारी झाल्याचे पाहायला मिळाले. (GT vs MI)

या चेंगराचेंगरीच्या स्थितीमुळे स्टेडियम व्यवस्थापकांकडून यासाठी योग्य व्यवस्था न केल्याचा आरोप चाहत्यांकडून केला जात आहे. यावेळी परिस्थिती एवढी अनियंत्रित झाली की, पोलिसांना बोलवावे लागले. यादरम्यान धक्काबुक्कीमुळे अनेक जण खालीही पडल्याचे दिसून आले.

या घटनेवेळी ज्यांनी क्वॉलिफायर-2 आणि फायनलसाठी ऑनलाईन तिकीट काढले होते, असे लोकही तिकीट घेण्यासाठी स्टेडियमवर पोहोचले होते. ऑनलाईन तिकीट असणार्‍यांनी काऊंटरवर क्यूआर कोड दाखवून तिकिटाची हार्ड कॉपी घेऊन जावी, असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे काही वेळातच गर्दी इतकी वाढली की, चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.

हेही वाचा; 

SCROLL FOR NEXT