Latest

FIFA World Cup : वर्ल्डकप दरम्यान कतारमध्ये ‘हे’ नियम मोडलात तर होणार कठोर शिक्षा!

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : कतारमध्ये विश्वचषकासाठी (FIFA World Cup) मैदाने सज्ज झाली आहेत. स्पर्धेसाठी पात्र ठरलेले संघ कतारमध्ये पोहचत आहेत. फिफा विश्वचषक २०२२ मधील पहिला सामना २० नोव्हेंबरला होणार आहे. स्पर्धेत ३२ देश सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा पाहण्यासाठी कतारमध्ये मोठ्या संख्येने फुटबॉल चाहते पोहोचत आहेत. परंतु, या देशाचे स्वतःचे कठोर नियम आहेत जे खेळाडुंसह चाहत्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतात.

फिफा विश्वचषक स्पर्धेच्या (FIFA World Cup) इतिहासात पहिल्यांदाच ही स्पर्धा आखाती देशात आयोजित केली जात आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ३२ देशांपैकी २७ देशांची संस्कृती अरब देशांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. चला पाहूया असे काही नियम जे कतारमधील कोणत्याही परदेशी चाहत्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात.

मद्यपानावर बंदी

कतार हा इस्लामिक देश आहे. विशेष म्हणजे आजही या देशात राजेशाही सुरू आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अत्यंत लहान असलेल्या या देशात दारू पिण्यावर कडक बंदी आहे. युरोपमधील एका सामन्यादरम्यान तुम्ही चाहत्यांना स्टेडियममध्येच बिअरचे ग्लास धरलेले पाहिले असेल, पण कतारमध्ये असे केल्यास शिक्षेची तरतूद आहे.

अशा कपड्यांवर बंदी

कतारमध्ये महिलांना अंगभर कपडे घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. तेथे तोकडे कपडे अथवा अंग प्रदर्शनास निर्बंध करण्यात आले आहेत. कतारमध्ये धार्मिक नियमांनुसार महिलांना अंगभर कपडे परिधान करण्याची सक्ती आहे. तेथे महिलांकडून हिजाब पोशाखाचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे अंग प्रदर्शन करणारे कपडे परिधान केल्यास तेथे तुरूंगवासही भोगावा लागू शकतो. तसेच पुरूषांनाही अंगभर कपडे घालण्यास सक्ती केली आहे.  तेथे तोकडे कपडे घालून फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

समलैंगिकता हा देखील गुन्हा

मध्यपूर्वेतील छोट्याशा देशात समलैंगिकता हा गुन्हा आहे. अशा गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. समलैंगिकतेच्या गुन्ह्यासाठी परदेशी नागरिकांना ७ वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. जेव्हा कतारला फिफा विश्वचषक २०२२ चे यजमानपद मिळाले. तेव्हा काही खेळाडूंनीही समलैंगिकतेबद्दल चिंता व्यक्त केली होती.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT