Latest

FIFA WC : वर्ल्ड कप गाजवत असलेल्या स्टार फुटबॉलपटूच्या घरावर सशस्त्र दरोडा

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा आतापर्यंतचा प्रवास चांगला राहिला असून एक दिवस आधीच संघाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. पण( हा दिवस संघाचा फॉरवर्ड खेळाडू रहीम स्टर्लिंगसाठी चांगला नव्हता कारण कौटुंबिक आणीबाणीमुळे त्याला ताबडतोब त्याच्या मायदेशी इंग्लंडला परतावे लागले आहे.

स्टर्लिंगच्या लंडन येथील राहत्या घरात काही हत्यारबंद लोकांनी घुसून दरोडा टाकल्याचे समोर आले आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली. त्यावेळी स्टर्लिंगचे कुटुंबीय पत्नी, तीन मुले त्या घरात उपस्थित होते. त्या घटनेमुळे सर्वजण बिथरले आहेत. त्यांना सावरण्यासाठी स्टर्लिंगने कतारमधून थेट मायदेश गाठल्याचे सांगण्यात येत आहे. दरोडेखोरांनी किंमती घड्याळ्यांसह तीन कोटींचा मुद्देमाल लंपास केल्याचे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.

इंग्लंडचे मॅनेजर गॅरेथ साउथगेट म्हणाले, 'याक्षणी रहीम स्टर्लिंगला त्याच्या कुटुंबासोबत राहणे गरजेचे आहे. त्याची ती प्राथमिकता आहे. संघ व्यवस्थापन त्याच्या पाठीशी आहे. परिस्थीती सावरण्यासाठी त्याला आवश्यक तेवढा वेळ देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.'

रविवारी रात्री उशिरा झालेल्या सेनेगल विरुद्धच्या सामन्यात 3-0 ने विजय मिळवून इंग्लंडने उपांत्यपूर्व फेरी गाठली. या सामन्यात स्टर्लिंग संघाचा भाग नसल्याने चाहत्यांनी भुवया उंचावल्या. आता उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य फ्रान्सविरुद्ध इंग्लंडचा सामना आहे. अशा परिस्थितीत या महत्त्वाच्या सामन्यासाठी स्टर्लिंगच्या उपलब्धतेवर शंका निर्माण झाली आहे. तो या महत्त्वाच्या सामन्यातून बाहेर राहू शकतो. हा सामना येत्या शनिवारी होणार आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT