चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा
मध्य चांदा वनविभागाच्या बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कारवा बेटात वनक्षेत्राचे कक्ष क्रमांक 500 मध्ये एका मादी वाघिणीचा मृतदेह आढळून आल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज शनिवारी (ता. २७ ) ला उघडकीस आली आहे. चार दिवसांपूर्वींच वाघिणीचा मृत्यू झाल्याचे वनाधिका-यांचे म्हणणे आहे.
मृतावस्थेत आढळून आलेली वाघीण 5 ते 6 वर्षाची आहे. तीन, चार दिवसांपूर्वी तिचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. वाघिणीचे संपूर्ण अवयव सुरक्षित आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे मार्गदर्शक तत्वानुसार पशुधन अधिकारी डॉक्टर विलास ताजने, कुंदन पोडशेलवार यांनी वाघिणीचे शवविच्छेदन केले. तिच्या मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी व्हिसेरा नमुने घेण्यात आले आहेत. शवविच्छेदनानंतर कारवा मध्यवर्ती रोपवाटीकेत वाघिणीचे दहन करण्यात आले.
हे ही वाचा :