पुढारी ऑनलाईन डेस्क: पंजाबमधील शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध मांगण्यासाठी रेल्वे रूळावर बसून 'रेल रोको' आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाती आज (दि.३०) तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. इतर मागण्या आणि दिल्लीतील आंदोलनातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पंजाबमधील किसान मजदूर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरू आहे. (Punjab Farmers Rail Roko Protest)
रेल रोको आंदोलनाच्या माध्यमातून एमएसपीसाठी समिती नेमावी, पुरात पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी, सरसकट कर्जमाफी द्यावी या मागण्यांसह दिल्लीतील शेतकरी आंदोलनाशी संबंधित खटले मागे घ्यावेत. आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्याकुटूंबियांना भरपाई आणि नोकऱ्यांची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. (Punjab Farmers Rail Roko Protest)
शेतकऱ्यांच्या तीन दिवसांच्या 'रेल रोको' आंदोलनात सहभागी शेतकरी देविदास पुरा येथे अमृतसर-दिल्ली रेल्वे मार्गावर बसले आहेत. तर काही होशियारपूरमधील आझाद किसान समिती दोआबाचे सदस्य स्थानिक रेल्वे स्थानकावर बसून मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर अनेक वळवण्यात आल्या आहेत. आंदोलनामुळे काही मार्गावरील गाड्या कमी देखील केल्या जात आहेत. (Punjab Farmers Rail Roko Protest)
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, फिरोजपूर रेल्वे विभागांतर्गत ९१ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ४८ गाड्यांचा प्रवास थांबवण्यात आला आहे, तर ३५ गाड्यांचा मार्ग वळवण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले की, या आंदोलनामुळे १७९ पॅसेंजर गाड्या आणि १४ मालगाड्यांचे कामकाज प्रभावित झाले आहे. आंदोलना दरम्यान रेल्वेने प्रवाशांना माहिती देण्यासाठी हेल्पडेस्क सुरू केला आहे.