Latest

मुलाचं निधन झालंय, घरासमोर डीजे लावू नका, या कारणावरून कुटुंबावर हल्ला

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे) : घरातील सदस्याचा मृत्यू झाल्याने डीजे वाजवण्यास मनाई केली. त्यामुळे चिडलेल्या २१ जणांनी मिळून कुटुंबीयावर जीवघेणा हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. २५) येथील शिंदेवस्ती परिसरात घडली. याप्रकरणी सुनील शिंदे (३८, रा. सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सुनील रजपूत (२८), मुकेश रजपूत (२६), रवी रजपूत (३०), सनी रजपूत (३२) प्रवीण रजपूत (३०), अक्षय काकडे (२८), अतुल रजपूत (२१), कृष्णा खराते (२३) रवी रजपूत (२८), संदीप रजपूत (२९), विशाल रजपूत (२९), संतोष काळूराम रजपूत (२५), विलास रजपूत (२२), अनिल रजपूत (३१), करसन रजपूत (५०) दीपक रजपूत (३२), आकाश रजपूत (२१), काळूराम राजपूत (५५), वसंत रजपूत (५१), अमित राजपूत (२४), रमेश रजपूत (५०, सर्व रा. शिंदेवस्ती, सोमाटणे फाटा) यांना अटक केली आहे.

फिर्यादी यांच्या मुलाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. दरम्यान, त्यांच्या घरासमोरून मिरवणूक काढण्यात आली. त्या वेळी फिर्यादीने आरोपींना परिस्थितीची कल्पना देत डीजे बंद करण्यास सांगितला. याचा राग आल्याने आरोपींनी आम्हांला ढोल- ताशे, डीजे वाजवू का दिला नाही, असे म्हणत फिर्यादी, त्यांचे मित्र किरण येवले, भाऊ गणेश शिंदे, वडील सदाशिव शिंदे, चालक जन्मराज कांबळे यांच्यासह एका महिलेला काठ्या, कोयत्याने मारहाण केली. यामध्ये सर्वजण गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी आरोपींवर खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT