नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सरत्या डिसेंबर महिन्यात देशाच्या निर्यातीमध्ये 38.91 टक्क्यांची वाढ झाली असल्याची माहिती व्यापार मंत्रालयाकडून शुक्रवारी देण्यात आली.
डिसेंबरमध्ये 37.81 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली असून या कालावधीत आयात 38.55 टक्क्याने वाढून 59.48 अब्ज डॉलर्सवर गेली आहे. डिसेंबरमधील व्यापार तूट सुद्धा वाढून 21.68 अब्ज डॉलर्सवर गेली आहे.
एप्रिल ते डिसेंबर या 9 महिन्यांच्या कालावधीत निर्यात 49.66 टक्क्याने वाढून 301.38 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. या काळात आयात 68.91 टक्क्याने वाढून 443.82 अब्ज डॉलर्सवर गेली आहे. नऊ महिन्यांच्या कालावधीतील व्यापार तूट 142.44 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे.
हे वाचलंत का?