Latest

Exit polls : गुजरातमध्ये पुन्हा भाजप तर आप पिछाडीवर

अमृता चौगुले

अहमदाबाद; पुढारी ऑनलाईन : गुजरात निवडणुकीच्या अंतिम टप्याचे मतदान सोमवारी (दि. 5) पार पडले. या सोबतच आता एक्झिट पोलचे भाकित येण्यास प्रारंभ झाला आहे. या भाकितांमध्ये भाजपच गुजरातमध्ये पुन्हा सत्ता स्थापन करेल असे स्पष्ट झाले आहे. तर अनेक एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मतदारांनी आपला मागे सारत काँग्रेसलाच दुसऱ्या स्थानी ठेवणार असल्याचे एक्झिट पोलचे अंदाज सांगत आहेत. पण, सध्या भारतात 'भारत जोडो'च्या माध्यमातून राहूल गांधी आणि काँग्रेसची लाट असल्याचे म्हटले जात होते. परंतु या लाटेचा तितकासा परिणाम गुजरातच्या मतदरांवर झालेला दिसत नाही. असा अंदाज एक्झिट पोलनी दर्शवलेला दिसत आहे. (Exit polls)

आजच्या मतदान प्रक्रिया समाप्त होताच आता विविध एक्झिट पोलचे अंदाज येण्यास सुरुवात झाली आहे. सर्व एक्झिट पोलच्या अंदाजानुसार गुजरातमध्ये पुन्हा भाजपच येणार असे आकडे समोर येत आहेत. यावेळी फक्त विजय नव्हे तर पुन्हा मागील निवडणुकीतील जांगापेक्षा अधिक जागा घेत मोठा विजय संपादन करेल असे पोलच्या अंदाजानुसार दिसत आहे.

टाईम्स नाऊच्या एक्झिट पोल नुसार भाजपला १३१, काँग्रेसला ४१, आप ६ तर इतर ४ जागा देत आहे. जन की बातच्या पोल नुसार भाजप १२९, काँग्रेस ४३, आप ८, अन्य २, टीव्ही ९ च्या अंदाजानुसार भाजप १२८, काँग्रेस ४५, आप ४, अन्य ५, पी – मार्क (P-Marq) नुसार भाजप १३८, काँग्रेस ३६, आप ६, अन्य २, एक्सीस माय इंडियाच्या अंदाजानुसार भाजप १४०, काँग्रेस २३, आप १५, अन्य ४ असे आकडे समोर आले आहेत.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रानीप येथील मतदान केंद्रावर तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादमधील नारनपुरा येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. दुसऱ्या आणि अखरेच्या टप्प्यात अहमदाबाद, वडोदरा, गांधीनगरसह १४ जिल्ह्यांतील 93 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. (Exit polls)

गुजरात निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 1) पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी मतदान झाले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान पार पडले. गुजरात विधानसभेत एकूण 182 जागा आहेत. 19 जिल्ह्यांतील या जागांसाठी 788 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी 89 जागांसाठी पहिल्या टप्प्प्यातील मतदान झाले होते. त्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. बनासकांठा, पाटण, मेहसाणा, साबरकांठा, अरावली, गांधीनगर, अहमदाबाद, आनंद, खेडा, महिसागर, पंचमहाल, दाहोद, वडोदरा आणि छोटा उदयपूर या जिल्ह्यांत सोमवारी मतदान प्रक्रीया पार पडली. (Exit polls)

या निवडणुकीत भाजप आणि आप सर्व 93 जागांवर निवडणूक लढत आहेत. तर काँग्रेस 90 जागांवर निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. इतर पक्षांमध्ये भारतीय ट्राइबल पक्षाने (BTP) 12 उमेदवार उभे केले असून बहुजन समाज पक्षाने (BSP) 44 उमेदवार उभे केले आहेत. २०१७ विधानसभा निवडणुकीत भाजपला ९३ पैकी ५१ जागांवर यश मिळाले होते. काँग्रेसला मात्र ३९ जागांवर समाधान मानावे लागले होते.

गुजरातच्‍या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष…

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी हाय-व्होल्टेज प्रचार झाला. गुजरातमध्‍ये भाजप 1995 सत्तेत आहे. यंदा सर्वाचे लक्ष निवडणूक रिंगणातील नवोदित आम आदमी पार्टीच्‍या कामगिरीकडे लक्ष लागले आहे . या राज्‍यातील निकाल हा २०२४ मध्‍ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीची मुहूर्तमेढ मानल्‍या जातील, असे मानले जात आहे.

मागील निवडणुकीत भाजपला ९९ जागांवरच समाधान मानावे लागले होते

1995 मध्ये जेव्हा सत्ताधारी भाजप पहिल्यांदा सत्तेवर आला तेव्हा सरासरी विजयाचे अंतर आणखी 15.7 टक्क्यांपर्यंत घसरले होते. तेव्‍हा भाजपने १२१ जागांवर बाजी मारली होती. तर २०१७ च्‍या विधानसभा निवडणुकीत केवळ ९९ जागांवरच समाधान मानावे लागले होते. सलग सहा वेळा भाजपने गुजरात विधानसभा निवडणूक जिंकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍या गृहराज्‍यातील निवडणूक भाजपसाठी प्रतिष्‍ठेची झाली आहे.

२०१७ मध्‍ये झालेल्‍या विधानसभा निवडणुकीत ५७ उमेदवार पाच टक्क्यांपेक्षा कमी फरकाने विजयी झाले होते. ही संख्या 1990 मध्ये 38 आणि 1980 मध्ये 24 होती.50 टक्क्यांपेक्षा जास्त फरकाने निर्वावाद जिंकलेल्या उमेदवारांची संख्या एकाच वेळी कमी होत आहे. 2012 मध्ये ही संख्या सात होती आणि 2017 मध्ये ती घसरली होती. गेली २७ वर्ष काँग्रेस भाजपमध्‍ये विरोधी बाकावर बसले आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७

भाजप ९९
काँग्रेस ७७
अपक्ष ३
भारतीय ट्रायबल पार्टी १
राष्‍ट्रवादी काँग्रेस १

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT