Latest

Excise policy case | मनिष सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत ५ एप्रिलपर्यंत वाढ

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : राजधानी दिल्लीतील तथाकथित अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात (Excise policy case) राऊस अॅव्हेन्यू या विशेष सीबीआय न्यायालयाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. सिसोदिया सध्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) ताब्यात आहेत. ईडीने ९ मार्च रोजी सिसोदियांना तिहार कारागृहातून अटक केली होती. अबकारी धोरणातील तथाकथित घोटाळ्याचा तपास सीबीआय देखील करीत आहे. सीबीआने २६ फेब्रुवारीला त्यांना अटक केली होती.

न्यायालयीन कोठडीदरम्यान कारागृहात सिसोदियांना औषधी, डायरी, पेन तसेच भगवद् गीता सोबत ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. कारागृहातील कैद्यांसाठी विपश्यनेची व्यवस्था असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने न्यायालयाला याआधी दिली होती. दिल्लीतील तथाकथित अबकारी धोरणातील घोटाळ्या प्रकरणात सहकार्य न करण्याच्या तसेच तपासकर्त्यांच्या प्रश्नांपासून पळ काढण्याच्या आरोपाखाली २६ फेब्रुवारीला सीबीआयने सिसोदियांना अटक केली होती.

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT