Latest

Nagar News : ‘झेडपी’ मेगाभरतीसाठी आजपासून परीक्षा सुरू

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा परिषदेच्या 935 जागांच्या मेगाभरतीसाठी परीक्षा आजपासून (शनिवार, दि. 7) सुरू होत आहेत. पहिलाच पेपर वरिष्ठ सहायक लेखाधिकारी हा असून, 400 परीक्षार्थी सहा केंद्रांवर ही परीक्षा देणार आहेत. त्यासाठी केंद्रप्रमुखांसह 32 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, रविवारी (दि. 8) विस्तार अधिकारी-सांख्यिकी या पदासाठी परीक्षा होईल. जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांच्या भरतीसाठी आयबीपीएस ही कंपनी परीक्षा प्रक्रिया राबविणार आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके त्यावर देखरेख करत आहेत. केंद्रप्रमुखांसह अन्य जबाबदारी म्हणून 32 पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहे. याशिवाय आयबीपीएस कंपनीचे कर्मचारीही परीक्षेसाठी सज्ज असतील.
सहा केंद्रांवर 400 परीक्षार्थींसाठी 400 संगणक तयार आहेत. याशिवाय अतिरिक्त व्यवस्था म्हणून 25 पेक्षा अधिक संगणकही राखीव असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

परीक्षा केंद्र
अचिव्हर्स इन्फोटेक- श्री भाऊसाहेब म्हस्के महाविद्यालय, टाकळी काझी; विश्वभारती अ‍ॅकॅडमिक कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, सारोळा बद्दी; श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, नेप्ती; सुमन टॅलेंट, बुरुडगाव रोड; तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान- सोनिया गांधी पॉलिटेक्निक श्रीगोंदा-मांडवगण रोड आणि श्री बबनराव पाचपुते विद्यालय ट्रस्ट परिक्रमा, काष्टी-दौंड रोड या सहा केंद्रांवर आज परीक्षा होणार आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT