Latest

Sameer Wankhede यांच्यावर होत असलेले आरोप चुकीचे: क्रांती रेडकर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आर्यन खान अंमली पदार्थांप्रकरणी एसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर (Sameer Wankhede ) भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आर्यनच्या कुटुंबाकडून किती कोटींची मागणी केली होती, याचीही माहिती समोर आली आहे. या वृत्तानंतर समर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. (Sameer Wankhede )

क्रांती रेडकर म्हणाली, त्यांच्यावर होत असलेले आरोप चुकीचे आहेत, हे सर्वांना माहीत आहे. हे केवळ आरोप आहेत आणि आम्ही सीबीआयच्या कारवाईत पूर्ण सहकार्य करत आहोत. कायदा आणि सुव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि आम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार आहोत. क्रांती रेडकर माध्यमांशी बोलत होती.

रिपोर्टनुसार, आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणातून सोडवण्यासाठी तत्कालीन एनसीबीचे झोनल डारेक्टर समीर वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आलाय. पण शेवटी वाटाघाटी करून रक्कम १८ कोटी करण्यात आली. टोकनची रक्कम म्हणून ५० लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आलाय.

SCROLL FOR NEXT