Latest

Evergreen Brocade : साड्यांसह अन्य कपड्यांवरही वाढत आहे ‘ब्रोकेड’ची क्रेझ

अनुराधा कोरवी

Evergreen Brocade : आपल्याकडची ब्रोकेड संस्कृती थेट सिंधू संस्कृतीच्या काळातली आहे. मोहेंजोदडो आणि हडाप्पाच्या उत्खननामध्ये ब्रोकेड सापडलेले नमुने म्युझियममधून बघायला मिळतात. त्यावेळी तर माशाच्या काट्यापासून तयार केलेल्या सुईमध्ये सोन्याची वा चांदीची जर ओवून ती रेशमावर भरली जात असे. आपल्याकडच्या ब्रोकेडमध्ये जी डिझाईन असतात ती जगात कुठेच दिसणार नाहीत.

भारतीय संस्कृतीमध्ये साडीला फार महत्त्व आहे. साडीमध्ये स्त्रीचे सौंदर्य अधिकच खुलते. सध्या या साड्यांचे खूपच प्रकार आणि ब्लाऊजचेही प्रकार पहायला मिळतात.

ब्रोकेड म्हणजे वोव्हन सिल्क. म्हणजेच सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीने डिझाईन विणलेलं रेशीम. रेशीम वजनाला खूपच हलकं असतं. तसेच प्लेन रेशमाचे कपडे तितकेसे उठूनही दिसत नाहीत. म्हणून रेशीम डिझाईनमध्ये विणण्याला जास्त पसंती दिली जाऊ लागली. भारतासह पर्शिया, चीन, जपान, तुर्कस्तान, इटली या सगळ्या संस्कृतीत ब्रोकेड प्रसिद्ध आहे. आता तर अंगावर वजनदार वाटणार्‍या आणि खिशाचं वजन कमी करणार्‍या बनारसी ब्रोकेडचा उपयोग साडीव्यतिरिक्त इतर प्रकारातही होऊ लागला आहे.

ब्रोकेडमधील मराठी पद्धतीच्या नऊवारी लूकची सलवार आणि त्यावर पोटिमा ब्लाऊज या प्रकारच्या पेहरावाला लग्नाच्या सीझनमध्ये मुली जास्त मान्यता देतात. ब्रोकेडमधील पर्शियन कार्पेट आजदेखील जगाला भुरळ घालतात. पर्शियन कार्पेटवर मोठ्या पानाफुलांची डिझाईनच अधिक दिसतात. तशीच डिझाईन त्यांच्या इतर वापरल्या जाणार्‍या पेहरावांवरही दिसतात. तर तुर्कस्तानमध्ये ब्रोकेडचा कार्पेट, वॉल हँगिंग, वॉल कार्पेटसाठी उपयोग केला जात असे. तिथे दरबारी मंडळींचे पेहराव प्रखर रंगातील चमकदार वेलवेट सिल्कवर सोन्या वा चांदीच्या जरीने मढविलेल्या ब्रोकेडमधले असत. छोटी छोटी पाने, फुले आणि भौमितिक रचना त्यांच्याकडे जास्त दिसत. Evergreen Brocade

– मानसी जोशी

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT