Latest

चर्चच्या नन्स आणि पाद्रीदेखील पॉर्न पाहतात, सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी दिली कबुली

दीपक दि. भांदिगरे

व्हॅटिकन सिटी : कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस (Head of the Catholic Church Pope Francis) यांनी चर्चच्या नन्स (nuns) आणि पाद्री म्हणजेच धर्मगुरु (priests) पॉर्न पाहत असल्याची कबुली दिली आहे. त्यांनी पुन्हा एकदा ऑनलाइन पाहिल्या जाणाऱ्या पोर्नोग्राफीच्या विरोधात इशाराही दिला आहे. सामान्य लोकांप्रमाणे नन्स आणि प्रिस्ट्स ऑनलाइन पोर्नोग्राफी पाहतात. हा दुर्गुण अनेकांमध्ये असून त्यात नन्स आणि प्रिस्ट्स यांचाही समावेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोप फ्रान्सिस यांनी नेहमीच पोर्नोग्राफीच्या विरोधात मत व्यक्त केले आहे. पोप फ्रान्सिस यांनी पोर्नोग्राफीला "सार्वजनिक आरोग्यासाठी धोका" म्हणून घोषित करण्याचे आवाहनही याआधी केले होते.

डिजिटल आणि सोशल मीडियाचा वापर चांगल्या कारणांसाठी कसा केला जावा यावर रोममध्ये शिकत असलेले प्रिस्ट्स आणि सेमिनारियन्सशी झालेल्या संवादात पोप फ्रान्सिस बोलत होते. "तुमच्यापैकी प्रत्येकाला असे वाटते की तुम्हाला डिजिटल पोर्नोग्राफीचा अनुभव आला असेल किंवा तुम्हाला मोह झाला असेल. हा एक दुर्गुण आहे जो बर्‍याच लोकांकडे आहे, ज्यात अनेक सामान्य पुरुष, स्त्रिया आणि अगदी प्रिस्ट्स आणि नन्स यांचादेखील समावेश आहे," असे पोप फ्रान्सिस यांनी म्हटले आहे.

"सैतान या माध्यमातून तुमच्यात प्रवेश करुन तो धर्मगुरुंच्या धार्मिक भावना कमकुवत करतो. पोर्नोग्राफीबद्दलच्या या तपशिलांकडे गेल्याबद्दल मला माफ करा, पण हे एक वास्तव आहे. हे वास्तव प्रिस्ट्स, सेमिनारियन्स, नन्स यांच्या हृदयाला स्पर्श करणार आहे." असे त्यांनी पुढे म्हटले आहे. ८६ वर्षीय पोप फ्रान्सिस यांनी प्रत्येकाने कोणताही मोह टाळण्यासाठी त्यांच्या फोनमधून डिजिटल पोर्नोग्राफी संबंधित सामग्री डिलीट करण्याचे आवाहन केले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT