Latest

Essential medicines : अत्यावश्यक औषध यादीत ३४ औषधांचा समावेश

नंदू लटके

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : ३४ औषधांचा समावेश अत्यावश्यक औषध यादीत करण्यात आला असून २६ औषधांना यादीतून वगळण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मंडाविया यांनी आज ( दि. 13 ) दिली. ( Essential medicines ) मधुमेह, एचआयव्ही, टीबी, कॉन्ट्रासेप्टिव्ह, हार्मोनल यावरील औषधांचा समावेश यादीत करण्यात आला आहे.

Essential medicines :  'एनएलईएम'मध्‍ये आता 384 औषधांचा समावेश

अत्यावश्यक यादीत सामील असलेल्या औषधांचे दर ठराविक मर्यादेपेक्षा वाढविले जाऊ शकत नाहीत. नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन्समध्ये (एनएलईएम) 2015 साली 376 औषधांचा समावेश होता. ही संख्या आता 384 वर गेली आहे.

'एनएलईएम'मध्ये सामील असलेल्या प्रमुख औषधांत अँटी इन्फेक्टिव्हज (अँटी बायोटिक्स, अँटी फंगल), मधुमेह, एचआयव्ही, टीबी, कॉन्ट्रासेप्टिव्हज, हार्मोनल मेडिसिन, ब्लड क्लॉदिंग डिसॉर्डरशी संबंधित औषधे, अ‍ॅनेस्थिक्स, मेरोपेनेम, सेफुरोक्साईम, इन्शुलिन ग्लारगाईन, टेनेलिगिपिटन यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कोविड – 19 संबंधित औषधे आणि लसीचा 'एनईएलएम'मध्ये समावेश नाही.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT