Latest

Esha Deol : १२ वर्षांनंतर ईशा देओलचा मोडला संसार; भरत तख्तानीसोबत घटस्फोट

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क :  ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि ड्रिमगर्ल हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल ( Esha Deol ) लग्नाच्या १२ वर्षानंतर घटस्फोट घेतला आहे. ईशाने २९ जून २०१२ रोजी बिझनेसमॅन भरत तख्तानीसोबत लग्न होतं. यानंतर आता तिने भरत तख्तानीसोबत घटस्फोट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या 

मिळालेल्या माहितीनुसार, ईशा आणि भरत तख्तानी या जोडप्याने एक निवेदन जारी करत परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. यात तिने म्हटलं की, "आम्ही परस्पर आणि सौहार्दपूर्ण मार्गाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनातील या बदलामुळे आम्ही आमच्या मुलींवर त्याचा परिणाम होऊ देणार नाही. आमच्यासाठी आमची मुलेच प्रथम प्राधान्य राहील. कृपया यावेळी या निर्णयाचा आदर करूयात." तर भरत तख्तानीचे बंगलोरमधील दुसऱ्या एका मैत्रीणीशी अफेयर असल्याचेही तिने म्हटलं आहे.

यानंतर ईशाने भरत तख्तानीसोबत काही फोटो सोशल मीडियावरून डिलीट केलं आहेत. तर दुसरीकडे भरतने मात्र, ईशासोबतचे फोटो डिलिट केलेले नाहीत. यावरून तो ईशाला पुन्हा एकदा संधी देतो की काय? यांची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. ईशा घटस्फोट घेतल्याची माहिती सोशल मीडियावर पसरताच चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय. एका यूजरने लिहिले की,, "ईशा असं करू नकोस… तुझं लग्न वाचव', 'कारण तुम्ही दोघेजण खूपच क्यूट कपल आहात'. '१२ वर्षांचा तुझा संसार आहे'.

भरत आणि ईशाची पहिली भेट शालेय एका स्पर्धेदरम्यान झाली होती. कॉलेजमध्येही दोघेजण एकमेंकाच्या संपर्कात होते. काही काळ दोघेजण एकमेंकांना डेंटिंग केल्यानंतर रिलेशनशिप आले आणि ईशाने भरतसोबत २९ जून २०१२ रोजी लग्न केलं.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ईशाने 'कोई मेरे दिल से पूछे' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने धूम, 'ना तुम जानो ना हम', 'क्या दिल ने कहा', 'हायजॅक' आणि 'प्यारे मोहन' सारख्या चित्रपटात काम केले. याशिवाय तिने अजय देवगणच्या 'रुद्र: द एज ऑफ डार्कनेस' मधून ओटीटीमध्ये पदार्पण केले.

SCROLL FOR NEXT