Latest

Engineer’s Day 2023 : मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या कोण होते? १५ सप्टेंबर ‘इंजिनिअर्स डे’ म्हणून का साजरा केला जातो?

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाभरात १५ सप्टेंबर रोजी इंजिनिअर्स डे साजरा करण्यात येतो. १५ सप्टेंबर हा दिवस भारतात इंजिनिअर्स डे म्हणून साजरा करण्यात येईल, असे भारत सरकारने १८६८ मध्ये जाहिर केले होते. पण तुम्हाला माहिती आहे का? भारतात इंजिनिअर्स डे साजरा करण्यासाठी १५ सप्टेंबर या दिवसाची निवड का करण्यात आली? भारतात आज (दि.१५) इंजिनिअर्स डे साजरा करण्यात येणार आहे. इंजिनिअर बनण्यासाठी अनेक विद्यार्थी गणित, भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र या विषयांचा अभ्यास करत असतात. यांपैकी अनेकांना सिव्हिल इंजिनिअर व्हायचे असते. मात्र, इंजिनिअर्स डे का साजरा केला जाऊ लागला?  हे जाणून घेऊयात… (Engineer's Day 2023)

१५ सप्टेंबर इंजिनिअर्स डे म्हणून का साजरा केला जातो? (Engineer's Day 2023)

१५ सप्टेंबर हा भारतरत्न मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस आहे. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या हे भारतातील पहिले सिव्हिल इंजिनिअर म्हणून ओळखले जातात. अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या अविश्वसनीय कार्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारतातील धरणे, जलाशये यांच्या निर्मितीसाठी त्यांनी मोठे परिश्रम घेतले होते. १९५५ साली एम.विश्वेश्वरय्या यांना भारतरत्न देण्यात हा पुरस्कार देण्यात आला होता. भारतरत्न पुरस्कार प्राप्त असलेले ते एकमेव इंजिनिअर आहेत. भारताशिवाय, श्रीलंका आणि टांझानिया येथे देखील १५ सप्टेंबर रोजी इंजिनिअर्स डे साजरा करण्यात येतो. (Engineer's Day 2023)

एम.विश्वेश्वरय्या यांचा जन्म म्हैसूर जिल्ह्यातील कोलार येथे झाला. त्यांचे वडिल श्रीनिवास शास्त्री हे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. शिवाय, आयुर्वेदाचाही त्यांचा अभ्यास होता. एम.विश्वेश्वरय्या यांच्या आईचे नाव व्यंकचम्मा असे होते. एम.विश्वेश्वरय्या हे १२ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लहानपणीचं वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. एम. विश्वेश्वरय्या पुण्यातून आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. पुण्याच्या शासकीय महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. खडकवासला प्रकल्पासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. (Engineer's Day 2023)

हेही वाचलंत का?
SCROLL FOR NEXT